(व्हिडिओ खाली अपलोड आहे)
पुणे(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- पिंपरी चिंचवड इलेक्ट्रीकल काॅन्र्टॅक्टर असोसिएशन चे कार्याध्यक्ष तथा पुणे जिल्हा विद्युत सनियंत्रण समिती सदस्य श्री संतोश रमाकांत सौंदणकर यांनी महावितरण पुणे विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे व बदल्यामधील अनियमितता तसेच इन्फ्रा 2 योजनेतील भ्रष्टाचाराबाबत मा. लोकायुक्त सौ, महाराष्र्ट राज्य यांच्याकडे तीन तक्रारी दि. 02.01.2018 ला एकुण व दि. 04.04.2018 रोजी दोन तक्रारी दाखल केल्या आहेत. तसेच त्यांच्या बेकायदेशीर नियुक्ती बद्दल मा. उच्च न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल केली आहे. याचा राग डोक्यात ठेवून आकसापोटी पुणे प्रादेशिक संचालक श्री संजय कृष्णराव ताकसांडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत श्री. संतोश रमाकांत सौंदणकर हे मालक असलेले *मे न्यु सिमरन इंटरप्रायझेस* या फर्मचे विद्युत ठेकेदाराचा सरकारी परवाना मा. मुख्य अभियंता पुणे यांना हाताशी धरून रद्द करून सौंदणकर हयांना महावितरण मध्ये कामबंदी ओदश लागु केला आहे.
वास्तविक पहता महातिवरण कंपनीत काम करणारा अधिकारी हा स्वच्छ चारित्राचा असणे गरजेचे आहे. परंतु संघटनेकडे पुणे प्रादेशिक संचालक श्री संजय कृष्णराव ताकसांडे यांच्या विरूध्द ते तत्कालीन वसई परिमंडळ येथे अधिक्षक अभियंता म्हणुन काम पहत असताना महावितरण कंपनी ची वीज चोरी करणा-या वीज ग्राहकाशी साटेलोटे करून ग्राहकां विरूध्द कारवाई न करता त्यांना संरक्षण दिल्या मुळे त्यांच्या विरूध्द महाराष्र्ट राज्य विद्युत वितरण कंपनीने माणिकपूर पोलिस स्टेशन येथे एफ आय आर क. 249/9010 दि. 06.10.2010 रोजी आय पी सी कलम 217/217 अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल केला आहे त्याबाबत वसई कोर्टात या महाश्ययांचे सदर प्रकरण समन्स वेटींग म्हणुन गेली 8 वर्ष दिसत आहे. महावितरण च्या सेवा विनियमा मध्ये या बाबत स्पष्ट उल्लेख असताना की कोणत्याही अधिकारी / कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हा एफ आय आर दाखल असल्यास त्यास महावितरण सेवेत पदोन्नती देता येत नाही.असे असताना देखील प्रादेशिक संचालक श्री संजय कृष्णाराव ताकसांडे यांनी प्रत्येक ठिकाणी काम करत असताना पदाचा गैरवापर करून तसेच जनतेच्या पैश्याच्या जोरावर स्वतःचे आर्थिक हित साध्य करत आज या पदावर पोहचले आहेत अशा भ्रष्ट असणा-या प्रादेशिक संचालक कडून जिल्हयातील अधिकारी /कर्मचारी काय बोध घेणार हा खरा प्रश्न आहे.
अशा भ्रष्ट प्रादेशिक संचालक श्री संजय कृष्णाराव ताकसांडे यांच्या विरूध्द आमचे संघटनेचे कार्याध्यक्ष श्री संतोश रमाकांत सौदंणकर यांनी सर्व पुराव्यानिशी मा. उच्च न्यायालयात केस दाखल केली आहे.
याचाच राग डोक्यात ठेऊन त्यांनी मे न्यू सिमरन इंटरप्रायझेस या फर्मचे लायसन्स रद्द करून कामबंदी आदेश लागू केला आहे. लायसन्स रद्द करण्यासंबंधी कोणतेही परिपत्रक जे 1.3 टक्के स्कीम च्या अंतर्गत काम करणा-या विद्युत ठेकेदाराला लागू होत नाही. मा. मुख्य अभियंता यांनी सदर लायसन्स रद्द करणेसंबंधी कोणतीही सुनवाही घेतली नाही. तसेच याबाबत कार्यवाही करताना त्याचे कोणतेही सबळ कारण त्यांनी स्पष्ट केलेले नाही. असे असताना सुध्दा केवळ प्रादेशिक संचालक श्री संजय कृष्णाराव ताकसांडे यांच्या आर्थिक हितास बाधा पोहचत असल्याने त्यांनी वरील कारवाई केली आहे.
या संदर्भात 22.11.2018 ला मुख्य अभियंता पुणे यांची आमच्या संघटनेच्या पदाधिकारी /सभासदांनी भेट घेऊन या बाबत विचारना केली त्यावेळी मा. मुख्य अभियंता यांनी मी काम बंदी आदेशाची पुनर्विचार करतो असे आम्हाला उत्तर दिले.
आज एक महिन्याहून अधिकचा काळ उलटून सुध्दा मा. मुख्य अभियंता पुणे यांच्या कडून श्री संतोष रमाकंत सौंदणकर यांच्या फर्म चे रद्द केलेले लायसन्स अजुन पुर्ववत चालु केले नाही म्हणुन पिंपरी चिंचवड इलेक्ट्रीकल काॅट्रॅक्टर असोसिएशन आज दि. 26.12.2018 पासून बेमुदत उपोषणास बसले आहे,यावेळी भा.विद्यार्थी सेना शहर प्रमुख रामभाऊ उबाळे, तिरोडा विधानसभेचे संपर्क प्रमुख युवराज दाखले,पुणे जिल्हा प्रमुख गजानन चिंचवडे,पिं.चि शहर प्रमुख योगेश बाबर,चिंचवड विधानसभा प्रमूख अनत कोर्हाळे,व इतर पदाधिकारी तसेच संघटनेचे अध्यक्ष- गिरीष बक्षी, उपाध्यक्ष -मनोज हरपळे, जावेद मुजावर -सचिव, नितिन बोंडे, खजिनदार – विशाल रोकडे, उत्तम काटे – पुणे जिल्हा इ काॅ. असोशिएयन खजिनदार, यांसह योगेश पवार,मंगेश सोनकांबळे, हनुमंत खांडेकर, विकास भोसले, महेश बाबर, अमित ठोंबरे, मनोज सचदेव, दिगंबर बोबडे, दिलीप कदम, दत्तात्रय कर्चे, अनंत को-हाळे, परमेश्वर कदम (देशमुख), वारे बी एस, अजित ढोबळे, एस बी पाटील, बी एम दरंदळे, अमोल कोकाटे, महादेव शारवाल, ज्ञानोबा मुंडे, गजानन तेलंग, गणेश गाडे, पप्पु वायसे, अनंद ननावरे, भाऊ थोरात, लखन वाघमारे, रमेश जैन, विलास गुडे, सचिन गुडे, धर्मेंद्र राठोड, श्रीनिवास मांडरे, नांदर्गे रामकृष्ण, नागोराव शारवाले, अर्जुने दिलीप, बाप्पासाहेब साळवे, चंद्रकांत सुर्यवंशी, ओम परदेशी, सतिश मरळ (देशमुख, ) किशोर आर शिंदे, अरून ढाके, हितेश नेमाडे, प्रशांत महाजन, वैभव राऊत, राजेंद्र पवार, सुरज भराटे, आकाष भराटे, राहुल जाधव, अशिष विश्वकर्मा, दिनेश राॅय, मनोज टखळे, प्रदीप बेळगावंकर, अरूण बडगुरज, संजय मोरे, किरण चामले, मुन्ना दांडेकर, अमोल जाधव, अरविंद सगर, गणेश भंडारी, अदित्य भोसले, बाळासाहेब सावळे, सागर बावीसकर, प्रसाद इखे, अमित रघुवंशी, दत्तात्रय झेंडे, भालचंद्र सावंत, गजानन काकडे, विरभ्रद चामणे, सुधिर चव्हाण. अदि संघटनेचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.इलेक्र्टिकल काॅन्र्टॅक्टर असोसिएशन आॅफ महाराष्र्ट,पुणे जिल्हा इलेक्र्टिकल काॅन्र्टक्टर असोसिएशन या संघटनेनी पाठिंबा दिला आहे.
Home ताज्या बातम्या संतोष रमाकांत सौंदणकर यांच्या फर्मवर बेकायदेशीर कामबंदीचा आदेश दिल्यामुळे पिंपरी- चिचंवड इलेक्ट्रीकल...