बीड,दि.१२ जुलै २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-अख्या देशांमध्ये महाराष्ट्र हा पूरोगामी राष्ट्र म्हणून ओळखला जात आहे महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व संघटनात्मक धोरणांमध्ये नैतिकता टिकून असून आज काल तिला बाधा होताना दिसत आहे. राजकारणातील पुतण्याच्या वादामुळे काकांचे झालेले पराभव हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अस्थिर स्वरूप असून मागच्या पाच वर्षापासून महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या सत्तांतरांचा वेग अनैतिक राजकारण आणि फुटीरतावादी, गटवादी राजकारणामुळे महाराष्ट्रातील सामान्य नागरिक,सामान्य मतदार, युवा तरुण कार्यकर्ता संभ्रम अवस्थे मध्ये आहे. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हटलं की त्या पक्षांच्या नेत्यांची त्या पक्षांच्या संस्थापक अध्यक्षांची व इतर आपल्याला पूरक असणाऱ्या लोकांची टमकी वाजवणं हेच कार्यकर्त्याच महत्त्वाचे कार्य म्हणून ओळखले जाते परंतु आज भाजपमध्ये असलेला नेता उद्या राष्ट्रवादीमध्ये जातो, राष्ट्रवादीचा नेता भाजपमध्ये जातो,शिवसेनेमध्ये जातो. शिवसेनेचा नेता अजून कोणत्या पक्षांमध्ये जातो म्हणजे रात्रीतून बदल घडवून नेता हा कोणत्या एका पक्षाचा राहत नसून महिन्यामध्ये दोन-तीन पक्ष बदलणारे काही नेते आहेत मग अशा परिस्थितीमध्ये विरोधक कोण? सत्ताधारी कोण? आपल्या पक्षाचा नेमका नेता कोण? त्याची विचारधारा काय? विकसात्मक अजेंडा काय? याचाच ताळमेळ लागत नसून पक्षाचे अनुयायी किंवा नेत्याचे अनुयायी किंवा कार्यकर्ता होणं म्हणजे कठीण झालेलं असून स्वतःचीच बदनामी करून घेतल्यासारखं वातावरण आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे.एकीकडे भाजप सारख्या पक्षांमध्ये पंकजाताई मुंडे सारख्या अतिशय बलवान नेत्याला जाणून बुजून वाळीत टाकले जात आहे आणि पर पक्षातून आलेल्या अजित पवार,एकनाथ शिंदे सारख्या नेत्याला मोठ मोठी पदे दिली जात आहेत.पक्ष त्यांच्यावरती लक्ष देत नाही महाराष्ट्रामध्ये पंकजाताई मुंडे सारख्या बलाढ्य नेत्याला फडणवीसाकडून डोळेझाक करून सर्रासपणे डावल जाते हे असं असताना अजातशत्रू असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार व त्यांचे नेते व शिवसेनेच्या एकनाथ शिंदे व त्यांचे नेते, इतर नेत्यांना सोबत घेऊन महाराष्ट्राची सत्ता स्थापन करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना रस निर्माण होत आहे हा विनाशकारी विपरीत बुद्धीचा भाग मनावा लागेल कारण फक्त सत्ताच पाहिजे मग जवळच्या लोकांचे झालेलं नुकसान,सहकाऱ्यांना डावलून पायाखाली घेणे पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांना विशिष्ट पदापासून दूर करणे,इतर पक्ष फोडून त्यांच्यातली नेते आपल्या पक्षात घेऊन त्यांना मोठमोठी पद देणं, हे फडणवीसांना जास्त दिवस तारत ठेवणार नाही यामुळे भाजपा हा पक्ष रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही आत्ता सत्ताच सत्तांतरण जरी झालं असलं तरी भविष्य काळामध्ये अनैतिकतेने राजकारण करणाऱ्या शिंदे गटावर व राष्ट्रवादीच्या फुटीरतावादी अजितदादा गटाच्या नेत्यांवर महाराष्ट्राची जनता लक्ष ठेवून असून थोड्या दिवसात यांचा गेम झाल्याशिवाय राहणार नाही असे स्पष्ट मत राजकीय विश्लेषक डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.पन्नास खोक्याचा आणि पक्ष फुटीचा शिंदेवर आरोप करणारे अजित पवार स्वतःच बीजेपी मध्ये स्वतःच्या काकाचा पक्ष फोडून जातात यात कोणती राजकीय नैतिकता आहे .अस म्यान होऊन शरण जाण्यापेक्षा राजकारण सोडण योग्य ठरेल कारण इथे विरोधक कोणीच नाही एकतर्फी सत्तेतून फडणवीस व भाजपा ला हिटलर व्हायचं आहे की काय ?
आजकालचे नेते पक्ष बदलीचा निर्णय हे कार्यकर्त्यांना विचारून घेत नसून स्वतःच्याच मनाने एका रात्रीमध्ये सेटलमेंट करून पक्ष बदलत आहेत. फक्त सत्तेसाठी आणि स्वतःच्या भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी च हे केले जात आहे असे स्पष्ट मत डॉ जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी व्यक्त केले.त्याचप्रमाणे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुद्धा पक्षातील निष्ठावान लोकांकडे दुर्लक्ष करून इन्कमिंग लोकांकडे जास्त लक्ष ठेवून आहेत म्हणजे आपला आपला म्हणून आपल्यावरच अत्याचार,अन्याय करायचा हे सर्रासपणे सर्वच राजकीय पक्षांमध्ये दिसून येत असून यामुळे “आपलं ते कार्ट आणि दुसऱ्याचे ते बाबू ” अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली असून यामुळे आंतरपक्षीय स्पोर्ट निर्माण होऊन प्रत्येक पक्ष रसातळाला जाऊन सर्वसामान्यांच्या हितासाठी लढणाऱ्या लोकांनाच भविष्य काळामध्ये चांगले दिवस येतील हे उघड उघड सत्य आहे. यामध्ये नुकतंच कर्नाटक-तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रामध्ये आगे कूच करणाऱ्या केसीआर यांच्या बी आर एस पक्षाला,बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाला तसेच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी या पक्षाला चांगल्या पद्धतीची पसंती मतदाराकडून मिळताना दिसत आहे. राजकारणातील जी पुढारलेली 171 घराणे आहेत त्या पुढारलेल्या घराण्यातील लोकांना आता जनता पायाखाली घेतल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी अनैतिकतेचा राजकारण करून मतदारांच्या भावनेशी खेळून स्वतःच्या लग्नासाठी वऱ्हाडांना उपाशी मारण्याचे काम सध्याचे पुढारलेले राजकारणी करत असून याचा दोष म्हणून नवनवीन पक्षांना व सामाजिक कार्यकर्त्यांना राजकारणात वाव मिळणार असून येत्या निवडणुकांमध्ये सत्तांतर झालेल्या पक्षांना याचा वाईट परिणाम भोगावा लागणार असून ज्या ज्या नेत्यांनी मूळ पक्ष सोडलेले आहेत त्यांची गोची निर्माण होणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अस्थिर राजकारणांमुळे महाराष्ट्राचा विकास होत नसून येथील मीडिया फक्त सत्तांतराच्या गोष्टी दाखवण्यात मग्न आहे शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, कामगारांच्या, बेरोजगारी, वाढती महागाई,शेती,सिंचन, भ्रष्टाचार इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींवर दुर्लक्ष होऊन महाराष्ट्र रसातळाला जाताना दिसत आहे.त्यामुळे येथील नवतरुणांना नव्या कार्यकर्त्यांना मी माननीय सम्राट डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर सांगू इच्छितो की नेत्यांमागे फिरण्यापेक्षा स्वतःचा उद्योग, नोकरी, छोटा-मोठा व्यवसाय आणि घरच्यांकडे लक्ष दिले गेले पाहिजे,स्वतःच्या बापाला बाप म्हणून कामात मदत करा, स्वतःच्या बापा पेक्षा नेत्याला मोठं मानणाऱ्या कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली असून आज एका पक्षाचा राजकीय नेता किंवा पुढारी असणारा माणूस रात्रीतून पक्ष बदलून दुसऱ्या पक्षाचा नेता होतो की ज्या पक्षावरती याने जहरी टीका केलेली असते तरीपण तो त्या पक्षाचा नेता होतो यामुळे कार्यकर्त्यांची प्रचंड प्रमाणात बदनामी आणि गोची होताना दिसत आहे,कोणता नेता कोणाचा, कोणता पक्ष कोणाचा हे कोणालाच ताळमेळ नसून यामध्ये निष्ठावान नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा अपमान होत आहे. सध्याचं सत्तांतरण म्हणजे इडीचा सत्तांतरण असल्यासारखा आहे जेही नेते भाजपामध्ये इन्कमिंग झालेले आहेत त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्यातरी भ्रष्टाचाराचा ठपका असून इतर पक्षांमध्ये राहिलेले गलिच्छ किंवा भ्रष्टाचारी नेते भाजपामध्ये आल्यानंतर धुतल्या तांदळासारखे अ भ्रष्टाचारी होऊन त्यांना सर्रासपणे मंत्री पदे दिली जातात हे अतिशय घृणास्पद असून राजकीय नैतिकतेचा तुटलेला कणा आहे. आणि यामुळे तुम्ही आमच्याकडे या तुमच्या चौकशा थांबवल्या जातील तुमच्या मागे ईडीची शिडी लावली जाणार नाही अशाच पद्धतीचा संदेश महाराष्ट्रासह भारत देशांमध्ये जात आहे. हे सर्व गंभीर असून किरीट सोमय्यासारखा सो कॉल्ड ईडी चा कार्यकर्ता इनकमिंग झालेल्या नेत्यांविषयी ट्रक भर पुरावे सादर का करीत नाहीत? भाजपामध्ये इन्कमिंग झाल्यानंतर त्यांच्या चौकशा का थांबवल्या जातात? भाजपामध्ये आल्यानंतर उघडलेल्या भ्रष्टाचाराच्या फाईली क्लोज का केल्या जातात? त्यांच्यावर ईतर पक्षात असतानाच्या कर्यावाह्या लगेच का थांबवल्या जातात असा खणखणीत सवाल सामाजिक कार्यकर्ते तथा राजकीय विश्लेषक आणि अभ्यास डॉक्टर जितीनदादा वंजारे खालापूरीकर यांनी विचारला आहे .