तळेगाव दाभाडे,दि.१२ मे २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला.हल्यात ते जखमी झाले असून त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. मारुती चौकातील नगरपरिषदेसमोर आवरे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या नगरपरिषद कार्यालया समोर दुपारी दोनच्या सुमारास हि घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन खाली आले होते. त्यावेळी तिथेच घाट धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर खूनी हल्ला चढवला. त्यापैकी दोघाजणांनी गोळीबार केला. तर आणखी दोघांनी कोयत्याने वार केले. आवारे यांच्या डोक्यात गोळी लागली,आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले माञ त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच आवारेंचा मृत्यु झाला.आवारे यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुगणालयात नेण्यात आले आहे. किशोर आवारे यांच्या मातोश्री सुलोचना आवारे या तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगरध्यक्षा आहेत.