Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड शहराच्या प्रथम लोकनियुक्त आमदार अश्विनीताई जगताप यांचा दणदणीत विजय,३६०९१ मताचे...

पिंपरी चिंचवड शहराच्या प्रथम लोकनियुक्त आमदार अश्विनीताई जगताप यांचा दणदणीत विजय,३६०९१ मताचे लीड;भाऊना ठरली खरी श्रद्धांजली

0

चिंचवड,दि.०२ मार्च २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- चिंचवड विधानसभेचा निकाल धक्कादायक आणि एक हाती लागेल असा कोणालाही अंदाज नव्हता मात्र पुन्हा चिंचवड मध्ये जगताप फॅक्टर जैसे थे चालला नाना काटे किंवा राहुल कलाटे या दोघांपैकी कोणीही उमेदवारी मागे घेतली असती. तरीसुद्धा अश्विनी जगताप यांना तेवढ्याच मताधिक्याने विजय मिळाला असता उलट पक्षी दोघांपैकी एकाने माघार घेतली असती तर दोघांपैकी एकाच काही मतदान हे अश्विनी जगताप यांच्या पारड्यात वाढले असते. त्यामुळे कोणी माघार घेतली किंवा कोणी माघार नाही घेतली याचा कोणताही फरक अश्विनी लक्ष्मण जगताप यांना फरक पडला नसता. लक्ष्मण भाऊ जगताप यांच्यावर प्रेम करणाऱ्या चिंचवड विधानसभेमधील मतदारांनी जगताप कुटुंब यावर तेवढेच प्रेम आजही करतात.तेवढाच विश्वास आजही ठेवतात हे आत्ताच्या निकालाने सर्वांना दाखवून दिले आहे.

त्यामुळे यात दुमत असे काही नाही.अश्विनी जगताप यांना १३५४३४ मते मिळाली व दणदणीत विजय त्यांना मिळाला.तर महाविकास आघाडीचे राष्र्टवादीचे पराभुत उमेदवार नाना काटे यांना ९९३४३ मते मिळाली.शिवसेनेचे बंडखोर व ज्यांचा गाजावाजा संपुर्ण चिंचवड विधान सभेत होता असे पराभुत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ४४०८२ मते मिळाली.अर्थातच अश्विनी ताईना ३६०९१ मतानी आघाडी मिळाली.पराभवाची कारणे अनेक आहेत.माञ महाविकास आघाडी व प्रस्थापित मिडियाने पराभवाचे अपयशाचे खापर राहुल कलाटे यांच्या माथी मारले हे तितकेच खरे,इतर अपक्ष उमेदवारांन पैकी नोटा ने जास्तीची मते घेतल्याने संपुर्ण विधानसभेत चर्चा चांगलीच रंगली पक्षाचे उमेदवार वगळता सर्व अपक्षाचे डिपाॅझिट देखिल वाचवता आले नाही.असो या निकालावर येणार्‍या महापालिकेचे निकाल माञ अवलंबुन होते.जितकी तत्परता पोटनिवडणुकी साठी दाखवली गेली तितकीच महापालिकेच्या निवडणुकी साठी पण शासनाने आणि निवडणुक आयोगाने दाखवावी व लवकारात लवकर मनपा च्या निवडणुका घ्यावेत अशी ठोस चर्चा माञ सर्व मतदारांन मध्ये होत आहे.

Previous articleकसब्यात काँग्रेसने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपच्या पारंपारिक मतदारसंघात काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर विजयी
Next articleस्त्रीशक्तीचा आदर करूया, बरोबरीचे स्थान देऊया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine − two =