Home ताज्या बातम्या भाजपाचे उमेदवार अश्विनीताई जगताप यांच्या सभेची धडकी महाविकास आघाडी आणि अपक्ष बंडखोर...

भाजपाचे उमेदवार अश्विनीताई जगताप यांच्या सभेची धडकी महाविकास आघाडी आणि अपक्ष बंडखोर उमेदवाराला भरली.

0

चिंचवड,दि.२३ फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-भाजपाचे उमेदवार अश्विनीताई जगताप यांच्या सभेची धडकी महाविकास आघाडीच्या उमेदवार नाना काटे आणि अपक्ष बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना बसली असल्याचे चिञे आज एकंदरीत स्पष्ट झाले.सांगवी साई चौकात पी डब्लु डी ग्राऊण्ड मध्ये भाजपा आणि मिञ पक्षच्या उमेदवार अश्विनीताई जगताप यांच्या प्रचार्थ सभेचे आयोजन केले.उपमुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,आरपीआय चे राष्र्टीय अध्यक्ष केद्रीय मंञी रामदास आठवले,भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,पुणे जिल्हा पालकमंञी चंद्रकांत पाटील,महिला प्रदेशध्यक्ष चिञाताई वाघ,अशा अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सभा असताना.राष्र्टवादी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या प्रचार्थ रोड शो रॅलीचे आयोजन केले.विरोधी पक्षनेते अजित पवार,राष्र्टवादीचे प्रदेशध्यक्ष जयंत पाटील अशा दिग्गज नेत्याच्या उपस्थितीत रोड शो,करण्यात आला,तर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचार्थ रॅली काढण्यात आली.माञ भाजपा च्या सभेच्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी ग्राऊण्ड शेजारील साई चौकत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व अपक्ष शिवसेनेचे बंडखोर उमेदवार कलाटे यांचे कार्येकर्ते आमने सामने आले ऐकमेकांने झेंडे दाखवत फडकवत घोषणाच गोंगाट केला.त्यात भाजपाचा कार्यकर्त्यानी भाजपाचे झेंडे दाखवले.तैनात असणार्‍या पोलिसानी दोन्हि रॅली गेल्यानंतर निष्ठेचा श्वास घेतला.साई चौक परिसर १५ ते २० मि. दणाणुन सोडला.माञ सर्वे परिसरात एकच चर्चा उडालीभाजपाचे उमेदवार अश्विनीताई जगताप यांच्या सभेची धडकी महाविकास आघाडी आणि अपक्ष बंडखोर उमेदवाराला भरली.

Previous articleकमळ फुलवण्यासाठी चिंचवड मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या रोड शोला गर्दी तुफान
Next articleआचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

thirteen − 8 =