Home ताज्या बातम्या शिवसैनिकांनवर कारवाई केली तशी राहुल कलाटेंनवर कारवाई करायला उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना...

शिवसैनिकांनवर कारवाई केली तशी राहुल कलाटेंनवर कारवाई करायला उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना घाबरते का ?

0

महाविकास आघाडीला धोका,शिवसैनिकांनवर कारवाई माञ बंडखोर उमेदवारावर अद्याप कोणतीच कारवाई नाही.

चिंचवड,दि.२२ फेब्रुवारी २०२३(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीत आघाडीतील ठाकरे शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहूल कलाटे हे महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यान मध्ये चर्चेत आहेत.त्यांना साथ देणाऱ्या आठ पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. माञ राहुल कलाटेंवर कारवाई करण्याचे धाडस ठाकरेंच्या शिवसेनेला न दाखविण्यात आल्याने ही कारवाई केल्याची चर्चा संपुर्ण शहरात पसरली आहे तसेच हे उशिराचे शहाणपण हि म्हणता येणार नाही.कारण हि कारवाई नुसती महाविकास आघाडीला आमच्या पासुन धोका नाही हा दाखविण्याचा केविलवाणा प्रयन्त आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि माजी आमदार अॅड. गौतम चाबूकस्वार आणि पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी हक्कल पट्टीची घोषणा केली आहे.त्या आठ जणांनी चिंचवड पोटनिवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षाचे चिंचवड विधानसभा महिला संघटिका अनिता तुतारे,शहर संघटिका रजनी वाघ,विभाग संघटिका शिल्पा आनपान, उपशहरप्रमुख नवनाथ तरस,विभागप्रमुख प्रशांत तरवटे, हनुमंत पिसाळ,पिंपरी विधानसभा समन्वयक गणेश आहेर आणि रवी घटकर यांना शिवसेनेतून काढून टाकण्यात आले आहे.सदर हकालपट्टी करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांत माञ संताप व्यक्त केला जात आहे.महाविकास आघाडीतील शहराच्या पदाधिकाऱ्यांचाही तसेच कार्यकर्त्यांचा चुपा पाठींबा असल्याचीही चर्चा वार्‍या सारकी पसरली आही.संपुर्ण शिवसेनेचा उद्धव ठाकरे गटाचा पदाधिकार्‍याचा पाठींब्यात समावेश असल्याने कलाटेंच्या बंडाला चिंचवडच नाही,तर संपूर्ण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची साथ मिळाली असल्याचे स्पष्ट चिञ दिसु लागले आहे. या कारवाईला कारणीभूत ठरलेल्या कलाटेंवर कारवाई न झाल्याबद्दल शहरात आश्चर्य व्य़क्त करण्यात येत आहे.कलाटे हे २०१९ पासुन पक्षा विरोधात बंड करत असुन दोन वेळा पक्षाच्या विरोधात निवडणुक लढवत असुन कारवाई का नाही,उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कलाटेंना घाबरती असे वातावरण दिसत असल्याने,राहुल कलाटे निवडुन आल्यानंतर एकनाथ शिंदे च्या शिवसेनेत किंवा भाजपात जाणार असल्याची चर्चा देखील असल्याने याचा फटका महाविकास आघाडी चे राष्र्टवादीचे उमेदवार नाना काटे सहीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बसणार आहे.
कलाटे हे पक्षात कुठल्याच पदावर नसल्याचे शिवसेना नेते आणि पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी दिलेले कारण मूळ शिवसैनिकांना पटलेले नाही. तसेच त्यांना या बंडखोरीत साथ देणारे आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्याबरोबर असणाऱ्या पक्षाच्या चार माजी नगरसेवकांवरही कारवाई अजुन केलेली नाही.महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यान संताप व्यक्त केला जात आहे.

कलाटेंचे हे दुसर्‍यांदा बंड असून आतापर्यंत त्यांनी पक्षादेश न पाळल्याची हॅटट्रिक सुद्धा केलेली आहे.२०१९च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्यांनी चिंचवडमध्ये बंडखोरी केली होती. अपक्ष म्हणून ते लढले.त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. तरीही त्यांच्याविरुद्ध त्यावेळी काहीच कारवाई झाली नव्हती. गेल्यावर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीवर सदस्य म्हणून अश्विनी चिंचवडे या नगरसेविकेची नियुक्ती करण्याचा पक्षादेश डावलून त्यांनी तेथे स्वत:ची वर्णी लावून घेतली. त्यानंतरही पक्षाने त्यांच्याविरुद्ध शिस्तभंग केल्याचा बडगा उगारला नव्हता. आता,तर पक्षच नाही,तर आघाडीविरुद्ध बंड करीत ते पोटनिवडणुकीत अपक्ष उतरूनही त्यांच्यावर कारवाई न झाल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.ज्या वचिंतचा दोनदा पाठींबा घेतला त्या वंचित मध्ये ही पक्षप्रवेश नाही.म्हणजे निवडुण आल्यास भाजपा किंवा शिंदे गटात गेल्यास मतदान करणार्‍या मतदारांना चुकल्या सारख वाटायला नको म्हणजे झाल.मतदार नागरीक सुज्ञ आहेत.ते काय निर्णय घेतात ते निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल

Previous articleनरेंद्र मोदींप्रमाणेच लक्ष्मण जगतापांनी केला विकास, एक मत विकासाची परंपरा सुरू ठेवण्यासाठी द्या; सर्वात तरूण खासदार तेजस्वी सूर्याचे आवाहन
Next articleBREAKING NEWS :: वंचितला मोठा धक्का शहरध्यक्ष देवेंन्र्द तायडे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − 7 =