रावेत,दि.१७ डिसेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-सिल्वरलॅन्ड रेसिडेन्सी १ आणि २ च्या अध्यक्षपदी धनंजय सोळुंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटी रजिस्टर झाल्यानंतर नुकतीच नव्याने कार्यकारणी जाहीर झाली आहे या सोसायटीच्या अंतर्गत जवळपास सुमारे ५५७ च्या आसपास सोसायटीत फ्लॅट आहेत प्रत्येक फ्लॅटचा मालक हा सोसायटीचा सदस्य असून ह्या सोसायटीचा मेंटेनन्स सोसायटीचे कार्यक्रम व सोसायटीच्या अंतर्गत होणाऱ्या विविध उपाय योजना यासाठी सोसायटीची कमिटी गठीत करण्यात आली आहे. सर्व कार्यकारणीची बिनविरोध निवड झाली असून या कार्यकारणीच्या माध्यमातून सोसायटीचा कारभार चालणार आहे सोसायटीच्या सर्व सभासद धारकांना ह्या कमिटीच्या अंतर्गत सर्व सुविधा पुरविल्या जातील व सर्व अडचणींचे निराकरण केले जातील वेळोवेळी सोसायटीचे नियम असतील व कार्यक्रम असतील किंवा काही सूचना असतील या कमिटी अंतर्गत दिल्या जातील व जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल असे नवनिर्वाचित अध्यक्ष धनंजय सोळंके यांनी प्रजेचा विकास सोबत बोलताना सांगितले. समीर लॉन्स च्या जवळ असून समीर लॉन्स चे मालक भावी नगरसेवक दिपक मधुकर भोंडवे यांनी या संपूर्ण सोसायटीच्या कमिटीला शुभेच्छा दिल्या आहेत जो विश्वास सर्व सभासदांनी ह्या कमिटीला दिला आहे त्याप्रमाणे ही कमिटी सोसायटीचे सर्व काम करतील आणि सर्वांना समान न्याय देतील अशी आशा व्यक्त करत दिपक भोंडवे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष धनंजय सोळुंके व त्यांच्या कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या.
खालील प्रमाणे सदर कार्यकारणीचे निवड करण्यात आली आहे.
अध्यक्ष-धनंजय सोळुंके
उपाध्यक्ष-योगेश उंबरकर
सेक्रेटरी-आशिष गरुड
खजिनदार-चिराग धरोड
सदस्य- श्याम ढाकणे
सदस्य-प्रविण थोटे
सदस्य-अलय विमल
सदस्य-रविंद्र मासाळ
सदस्य-संकल्प साठे
सदस्य-समीर आहाळे
सदस्य-संग्राम राऊत
सदस्य-प्रशांत जगताप
सदस्य-श्रीकांत शुक्ला
सदस्य-बिजेश कुमार
सदस्य-प्रवीण खेंगरे
सदस्य-स्वप्निल खरे
सदस्य-अंकुर अरोरा
सदस्य-मंगलाबाई देसले
सदस्य- नम्रता बाविस्कर