चिंचवड,दि.१० डिसेंबर २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मिडिया समोर येऊन गुन्हे दाखल करु नका म्हणारे,शेवटी गुन्हा दाखल करायला लावतात.वादग्रस्त वक्तव्ये करणारे चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री पुणे यांचे पिंपरी चिंचवड दौ-या दरम्यान घडलेल्या घटनेबाबत अखेर आंबेडकरी योद्धानवर गुन्हे दाखल.स्विकृत मा.नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी जमावातुन केली जात आहे,त्या सोबत पोलिस ठाणे जवळ येऊन शाई फेकणार्यानां बाहेर काढा असा आरडाओरडा करणारे ते तरुण कोन त्यांचावर पण गुन्हा दाखले करण्याची मागणी करण्यात आली.
आ. चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री पुणे हे आज दिनांक १० डिसेंबर २०२२ रोजी पिंपरी चिंचवड येथे मोरेश्वर शेडगे माजी नगरसेवक यांचे निवासस्थानी सदिच्छा भेट देवुन ते श्री मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ येथील कार्यक्रमास मोरेश्वर शेडगे यांचे निवासस्थानातुन निघाले असताना ५.५० वा पायर्यावरुन खाली उतरत असताना अचानकपणे समोरून एक अनोळखी इसम जोरात पळत आला व मा. मंत्रीमहोदय यांच्या चेह-यावर काळ्या रंगाचे द्रव्य फेकले. द्रव्य फेकणा-या इसमाला व त्याचे इतर साथीदारांना लागलीच पोलीसांनी जागेवरच ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्यांची नावे १) मनोज भास्कर घरबडे, वय ३४ रा. गोकुळ हॉटल जवळ पिंपरी (समता सैनिक दल संघटक ) २) धनंजय भाऊसाहेब इजगज वय २९ वर्षे रा. आनंदनगर चिचवड पुणे (समता सैनिक दल सदस्य) ३) विजय धर्मा ओव्हळ वय ४० वर्षे रा. आनंदनगर चिचवड पुणे ( वंचित बहुजन आघाडी सचिव) असे असल्याचे निष्पन्न झालेले आहे. वरील इसमांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा दिल्या. सदर बाबत चिंचवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि.नं. ५५३/२०२२ भादवि कलम ३०७, ३५३, २९४, ५०० ५०१ १२० ( ब ) ३४ क्रिमीनल लॉ अमेन्डमेन्ट अॅक्ट कलम ७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ ( १ ) / १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास चिंचवड पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खराडे हे करीत आहेत.
माञ हा गुन्हा दाखल झाल्याने आंबेडकरी समाजात प्रचंड नाराजीच वातावरण निर्माण झाले आहे.सदर प्रकार हा चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबाद पैठण या ठिकाणी वादग्रस्त वक्तव्ये केले होते.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,मा.फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भिक मागुन शाळा सुरु केल्या अशा वक्तव्यामुळे संपुर्ण महाराष्र्टात असंतोष पेटला आहे.अखेर असा गुन्हा दाखल झाल्याने हे प्रकरण अजुन चिघळण्याची चिन्ह वाढले आहेत.
चंद्रकांत पाटलांचा दौरा हा नियोजित असताना चंद्रकांत पाटलांचा फेरबदल कसा झाला स्वीकृत नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या घरी कसा वळाला या वरुन मोरेश्वर शेंडगे यांच्यावर आंबेडकरी कार्यकर्त्याचा संशय बळावला आहे.कारण नियोजीत सरकारी ताफा घरी घेउन जाणे,म्हणजे सरकारी कामात व्यतय आणण्याचा भाग आहे.दंगल घडवुन आणन्याचा भाग तर नाही ना अशी चर्चा संपुर्ण शहरभर पसरली आहे.