Home ताज्या बातम्या रावेत नवराञ उत्सव-मोरेश्वरभाऊ भोंडवे आयोजीत भव्य रास दांडिया स्पर्धेचे आयोजन

रावेत नवराञ उत्सव-मोरेश्वरभाऊ भोंडवे आयोजीत भव्य रास दांडिया स्पर्धेचे आयोजन

0

रावेत,दि.24 सप्टेबंर 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- रावेत प्राधिकरण नागरिक समिती आयोजित नवरात्र उत्सव 2022 भव्य दांडीया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज दहा स्पर्धकांना उत्कृष्ट खेळाडू सन्मानचिन्ह तर प्रथम बक्षीस 51,000/-रु आणि सन्मान चिन्ह, द्वितीय बक्षीस 25,000/-रु व सन्मान चिन्ह, तिसरे बक्षीस 15,000/-रु व सन्मान चिन्ह तसेच लकी ड्रॉ च्या माध्यमातून दररोज दोन मानाच्या पैठणी जिंकण्याची संधी हि स्पर्धा दररोज सायंकाळी 7.00 वा ते 11.00 वाजेपर्यंत.सोमवार दिनांक 26 सप्टेंबर 2022 ते मंगळवार दिनांक 4 ऑक्टोबर 2022 पर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.आपल्या प्रभागातच स्थळ- डी मार्ट शेजारील मैदानात सेक्टर 29 रावेत प्राधिकरण या ठिकाणी हा नवरात्र उत्सवात या स्पर्धा होणार असून या स्पर्धेचे निमंत्रक माननीय श्री मोरेश्वरभाऊ महादू भोंडवे मा. नगरसेवक तसेच पुणे जिल्हा नियोजन समिती (पीएमआरडीए) यांनी भव्य रास दांडिया स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देताना म्हटले की प्रभागात सर्व कार्यक्रम सर्व परीने घेतले जातात त्यामुळे रावेत किवळे या भागातील सर्व नागरिक सर्व कार्यक्रमात सहभागी होतात गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक असल्याकारणाने मी संपूर्ण प्रभागात पाहत आहे नागरिक सर्वत्र एकत्र असतात जोमाने सहभागी होतात त्यामुळे त्यांचा आनंद द्विगुणीत होतो त्यांच्या आनंदातच मला अजून आनंद मिळतो म्हणून अशा कार्यक्रमांमध्ये स्पर्धा घेऊन लोकांचा उत्साह द्विगुणीत करण्याचा प्रयत्न आम्ही सतत रावेत प्राधिकरण नागरिक समितीच्या माध्यमातून करत असतो. नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सर्वांनी या स्पर्धेत सहभागी व्हावं व सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे.

Previous articleशिंदे गटाला झटका;शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच,ठाकरेना मैदान मिळाले मुंबई उच्च न्यायालयचा निर्णय
Next articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ना धमकी देणाऱ्याला पोलिसांनी लोणावळ्यात केली अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 − 11 =