हाच तर देशातल्या स्वातंत्र्याचा मृत महोत्सव
देशातच्या स्वातंत्र्य लढाईत कधीही सहभाग न नोंदवणारे आज स्वातंत्र्याच्या लढाईत सहभागी असल्याचे भारतीय जनतेला भासवत आहेत,
देशावर हुकूमशाहीचं ओझं टाकून लोकशाहीला संपवत आहेत
ही देशासाठी मोठी घातक प्रक्रीया सुरू झालेली आहे.
भारतीय संविधान व भारतीय राषट्रध्वजावर कधीही प्रेम न करणारे आज त्याच संविधानविरोधी व भारतीय राष्ट्रध्वजविरोधी द्वेषी आरएसएसला अचानकपणे प्रेम उफाळून आले आहे.
हे उफाळून आलेलं प्रेम खरच अंतर्मनातून आलं आहे का ?
असा प्रश्न जर भारतीय जाणकारांना विचारला तर त्याचं उत्तर नक्कीच ‘नाही’ असेच मिळेल.
मग आज जे देशात अचानकपणे संविधानाबद्दल व भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जे गोडवे गायले जात आहे ते काय आहे ?
तर त्याचे उत्तर जाणिवपुर्वक स्पष्टपणे समजून घ्यायला हवे की,हे प्रेम नसून भारतीय जनतेला फसवणारा एक कमळातला फसवा मुखवटा आहे.
संविधानावर व भारतीय राष्ट्रध्वजावर आमचे खुप प्रेम व श्रध्दा आहे असे भासवायचे,
जनतेचा विश्वास जिंकायचा आणि देशात व राज्या राज्या बहूमतात सत्ता स्थापण करायची,अन् अचानकपणेच या विश्वासाचा घात करून संविधान बदलून देशाचा राष्ट्रध्वजही बदलून टाकायचा हा संघीयांचा प्रयत्न आहे,संघीयांच्या अनेक कृतीतून हे वारंवार सिध्द झालेलं आहे.
अनेक राज्यात सत्ता हाती येत नाही हे लक्षात आल्यानेच केंद्रीय यंत्रणाना हाताशी धरून त्यांच्यावर दबाब टाकून त्यांचा गैरवापर करून राज्या राज्यातली सत्ता उलथवून टाकण्याचे काम सध्या देशात संघीयांकडून सुरू आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
> देशातली जातीयता संपायचं नाव घेत नाही,
> देशातली बेरोजगारी हटता हटत नाही,
> महीलांवरील अत्याचार संपता संपत नाही,
> देशातल्या लोकशाहीचं संरक्षण करू दिल्या जात नाही,
> आर्थिक विषमता मिटू दिल्या जात नाही,
> जाती धर्माच्या आधारावर भेदा भेद मजबूत केल्या जात आहे,
> जिथे आजही पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे,
> जिथे आजही अस्पृष्यता पाळली जात आहे,
> जिथे उच्चपदस्थ उच्च न्यायालयाचे न्यायाधिश विषमतावादी मनुचे गुणगाण गात आहे,
अशा परिस्थितीतला हा कसला,
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
हा तर मृत महोत्सवच म्हणावा लागेल,
ज्या देशात आपल्या राष्ट्रध्वजाचा सन्मान होत नाही,
राजमुद्रेचा सन्मान होत नाही,
आरएसएस प्रणित भाजपाच्या पंत प्रधानांनी
हर घर तिरंगा हा नारा देऊन राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे.
संविधानिक तरतुदीनुसार या राष्ट्रध्वजाला सन्मान मिळायलाच हवा होता,
परंतू,
देशात बहुतांश नागरिकांना कुठलेही नियम माहीत नसल्यामुळे राष्ट्रध्वजा प्रती असलेली संविधानिक नियमावली चक्क पायदळी तुडवून देशद्रोह केला जात आहे,
राष्ट्रध्वजाला ना साईज होती,
ना कापड व्यवस्थित होतं,
काही जणांनी तर चक्क राष्ट्रध्वजावरच अशोक चक्रच गायब केलं,
राष्ट्रध्वजावर कुठल्याही प्रकारे डाग लागू नये याची खबरदारी घ्यायला हवी होती,
परंतू ती घेतली गेलेली दिसली नाही,
काही नालायक लोकांनी राष्ट्रध्वज गाडीच्या चाकाजवळ लावला अन् त्यावर चिखलाचे शिंतोडे उडवून राष्ट्रध्वजाचा अपमान गेला,
हीच का तुमची राष्ट्रध्वजाप्रती असलेली आस्था अन् हेच का प्रेम..?
एक एक प्रयोग करून विविध पध्दतीने संविधानाचा व राष्ट्रध्वजाचा अपमान करायचा हे संघोट्यांनी ठरवूनच टाकलेलं आहे,
हे न समजण्याइतपत संविधानप्रेमी दुधखुळे नाहीत हे लक्षात घ्या संघोट्यांनो..
सत्ता हातात आहे म्हणून वाट्टेल ते करण्याचं धाडस करू नका,
काळ आणि वेळ बदलत असते,
तेव्हा पळतीभुई थोडी होईल,
हळूहळू तुमचे मुखवटे गळून पडत आहेत,
जनता हुशार आहे ती सावध होत आहे,
तुमच्या हुकूमशाही दहशतीला काहीकाळ घाबरून शांत आहेत,
सयंम संपला की क्रांतीला सुरूवात होते हा निसर्ग नियम आहे हे विसरू नका,
संघी विचारधारेच्या लोकांनी व अडाणचोट बांडगुळांनी आपापल्या घरावर राष्ट्रध्वज उभारतांना जाणिवपुर्वक काळजी घेतलेली दिसत नाही,
राष्ट्रध्वज हे हवेने वाकडे तिकडे झाले तर काही खाली पडले त्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही,
एवढं मुखवटी प्रेम या निमित्ताने दिसून आले.
संविधानाप्रती व राष्ट्रध्वजाप्रती एवढंच प्रेम,आपुलकी,जिव्हाळा,
असेल तर तो प्रत्यक्ष कृतीमधून सिध्द व्हावा,
संविधानप्रेमी व राष्ट्रध्वजप्रेमींनी संविधान व राष्ट्रध्वज काळजात कोरला आहे,
मुखवटा चढवून दिखावा करणारी ही संविधानप्रेमी व राष्ट्रध्वजप्रेमीं मंडळी नाहीत हे लक्षात ठेवा.
आरएसएस प्रणित संघीय लोकांकडून आजवर असेच झाले आहे,जी जी लढाई जिंकता येत नाही ती जिंकण्यासाठी दोन पाऊले मागे येऊन जनतेला विश्वासात घेऊन जनतेला गाफिल करायचे व विनाशकाले विपरीत बुध्दी
देशावर विकृत चाल करून आपल्याला हवे तसे कृत्य करायचे,
त्यामूळे गाफिल राहून चालणार नाही,ते घातकी चाल करून येऊ शकतात,म्हणून जरा सावध राहूनच त्यांच्या प्रत्येक कृतीवर बारीक लक्ष ठेऊन असायला हवे,तरच भविष्यात होणा-या परिणामापासून वाचायला संधी मिळू शकते,
अन्यथा आरएसएस ही देशाचा घातपात करू शकते,
जशी सातत्याने लोकशाही तथा संविधान पायदळी तुडविण्याचे काम सध्या संघीय प्रणित भाजपा करतांना दिसत आहे.
म्हणून प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकाविण्यापेक्षा प्रत्येकाच्या काळजात राष्ट्रध्वज फडकवा,
हाच खरा संविधानाचा,राष्ट्रध्वजाचा,लोकशाहीचा पर्यायाने देशाचा सन्मान होईल व या देशातला प्रत्येक नागरीक सुरक्षित होईल..
एवढंच यानिमित्ताने..
भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायु होवो
विकास साळवे,पुणे
9822559924