देहुरोड,दि.०९ ऑगस्ट २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-देहूरोड कॉंटमेंट बोर्ड ला देहुरोड नगरपरिषद करण्याबाबत मागील सहा महिन्यापूर्वी सागर कृष्णाजी लांगे (भाजप प्रणित: नवभारतीय शिव वाहतूक संघटना, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांच्या माध्यमातून सर्वपक्षीय सर्वसामाजिक संस्था धार्मिक संघटना व देहूरोड मधील सर्व नागरिकांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन, विद्यमान मुख्यमंत्री, देहूरोड कँटोन्मेंट बोर्डा चे कार्यकारी अधिकारी स्थानिक खासदार श्रीरंग आप्पा बारणे स्थानिक आमदार तसेच शासकीय संबंधित खात्याचे अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते व त्याचा सागर लांगे , व यांचे सहकारी यांच्या माध्यमातून वेळोवेळी सर्वांकडे पाठपुरावा केला जात आहे,
मा. अध्यक्ष अल्पसंख्यांक आयोग, भाजप प्रणित नवभारतीय शिव वाहतूक संघटना चे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या अध्यक्षतेखाली रंगशारदा सभागृह मुंबई या ठिकाणी हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमांमध्ये देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे रूपांतर नगर परिषदेमध्ये करण्याकरीता कार्यक्रमांमध्ये उपस्थित भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, माजी मंत्री अर्जुन खोतकर, माजी आमदार आशिषजी शेलार, माजी आमदार नितेशजी राणे, माजी आमदार अभिमन्यू पवार, वाहतूक संघटनेचे कार्य अध्यक्ष मंगेश सांगळे, सिने अभिनेत्री व संघटनेच्या महिला कार्याध्यक्ष इशाजी कोपीकर यांना संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफत शेख व सागरजी लांगे, काँटोन्मेंट बोर्डाचे मा. उपाध्यक्ष रघुवीर शेलार,वाहतूक संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष दिपक वाल्हेकर ,विलास शिंदे ,उपाध्यक्ष भाजपा धीरज नायडू, दिनेशभाई सिंग, प्रवीण आखाडे यांनी निवेदन दिले.
या कार्यक्रमांमध्ये बोलताना चंद्रकांत दादा पाटील यांनी देहूरोड कॉंटमेंट बोर्ड ऐवजी नगरपरिषद करण्याच्या विषयासंदर्भात लवकरात लवकर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी चर्चा करून ,देहूरोड कॉंटमेंट बोर्डाचे नगर परिषदेमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करू असे आश्वासन दिले. तसेच राष्ट्रीय अध्यक्ष हाजी भाईं अराफत शेख, सागरजी लांगे यांच्या पुढील कार्याला दादांनी शुभेच्छा दिल्या. हर घर तिरंगा अभियानांतर्गत भाजप प्रणित नव भारतीय शिव वाहतूक भाजपा ट्रान्सपोर्ट सेलच्या वतीने मुंबईत आयोजित विशेष कार्यक्रमात अध्यक्ष हाजी अराफत शेख यांच्या पुढाकारातून टॅक्सी रिक्षा आधी वाहतूकदारांना छत्री आणि ७५ हजार राष्ट्रध्वज वाटप करण्यात आले