पिंपरी-चिंचवड,दि.३१ मे २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार यंदाचे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२२ चे आज आरक्षण सोडत रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे थेट पार पडली यावेळी अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी नेते पत्रकार महानगरपालिकेचे अधिकारी निवडणूक अधिकारी यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत झाली अनुसूचित जाती (एससी) अनुसूचित जमाती (एसटी) आणि अनेक खुला (ओपन),महिला राखीव ७० जागांसाठी सोडत काढण्यात आली ४६ प्रभागाचे आरक्षण निश्चित करण्यात आले राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाशिवाय यंदाची निवडणूक घेण्यास सांगितले नाही निवडणुकीत ओबीसी आरक्षण नाही आहे हे स्पष्ट झाले आहे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत १३९ नगरसेवकांना निवडून द्यायचे आहे त्यातील ५० टक्के म्हणजे ७० जागा महिलांसाठी राखीव आहेत आज आरक्षण सोडत झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांचा मार्ग मोकळा झाला अनेक घरी असणाऱ्या महिलांना यंदा नगरसेवक होण्याची संधी मात्र इच्छुक उमेदवारांनी केलेले काम व केलेला खर्च त्यामुळे आता स्वतःला जरी संधी नसले तरी मात्र स्वतःच्या पत्नीला व घरातील महिलेला निवडणूक रिंगणात उतरवण्याचे निर्णय अनेक उमेदवारांनी घेतले आहे त्यामुळे आजची आरक्षण सोडत व महिला आरक्षण सोडत जरी झाली असली तरी कोणताही फरक यावर पडणार नाही मात्र इच्छुक उमेदवारांच्या खर्चावर ताण पडणार असल्याची चर्चा संपूर्ण शहरभर रंग भरत आहे यंदाची निवडणूक प्रत्येक पक्षाचे शहराध्यक्ष यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी आणि त्यांचा कस काढणारी ठरणार आहे त्यामुळे प्रत्येक पक्षाचे शहराध्यक्ष त्यांच्या पक्षश्रेष्ठींच्या नेतृत्वात काय निर्णय घेतात याकडे सर्व जनतेचे लक्ष लागून आहे पहा खालील प्रमाणे प्रभागनिहाय आरक्षण
प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे –
प्रभाग क्रमांक १ : तळवडे-रुपीनगर-त्रिवेणीनगर (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक २ : चिखली गावठाण-मोरेवस्ती-कुदळवाडी (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३ – मोशी, बोऱ्हाडेवाडी-जाधववाडी (१. महिला, २. खुला ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४ : मोशी गावठाण-गंधर्वनगरी-डुडूळगाव (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ५ : चऱ्होली-चोविसावाडी-वडमुखवाडी (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ६ : दिघी-बोपखेल (१. एसटी, २.महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ७ : भोसरी सॅण्डविक कॉलनी (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ८ : भोसरी गावठाण-गवळीनगर-शितलबाग (१. महिला, २. महिला, ३.खुला)
प्रभाग क्रमांक ९ : भोसरी, धावडेवस्ती-चक्रपाणी वसाहत (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १० : भोसरी, इंद्रायणीनगर-लांडेवाडी-गव्हाणेवस्ती (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ११ : भोसरी, बालाजीनगर-लांडेवाडी-स्पाइन रस्ता (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १२ : चिखली,घरकुल-नेवाळेवस्ती (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १३ : चिखली, मोरेवस्ती-म्हेत्रेवस्ती (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १४ : निगडी, यमुनानगर (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १५ : संभाजीनगर-पूर्णानगर-शाहूनगर (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १६ : नेहरूनगर-विठ्ठलनगर-यशवंतनगर (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १७ : संत तुकारामनगर-महात्मा फुलेनगर (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १८ : मोरवाडी-अजमेरा कॉलनी-गांधीनगर-खराळवाडी (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक १९ : चिंचवड स्टेशन-मोहननगर-आनंदनगर (१. एससी महिला, २. महिला ३. खुला)
प्रभाग क्रमांक २० : काळभोरनगर-रामनगर-अजंठानगर (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक २१ : आकुर्डी गावठाण-दत्तवाडी (१. महिला २. महिला ३. खुला)
प्रभाग क्रमांक २२ : निगडी गावठाण-ओटास्किम (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक २३ : निगडी, भक्ती शक्ती-वाहतूकनगरी (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक २४ : रावेत-किवळे-मामुर्डी (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक २५ : वाल्हेकरवाडी (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक २६ : चिंचवडेनगर-बिजलीनगर-दळवीनगर (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक २७ : उद्योनगर-रामकृष्ण मोरे सभागृह (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक २८ : चिंचवड, केशवनगर-श्रीधरनगर (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक २९ : भाटनगर-पिंपरी कॅम्प-मिलिंनदगर (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३० : पिंपरीगाव-वैभवनगर (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३१ : काळेवाडी-विजयनगर-नढेनगर (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३२ : काळेवाडी, तापकीरनगर-ज्योतीबानगर (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३३ : रहाटणी-तापकीरनगर (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३४ : थेरगाव, बापुजीबुवानगर-शिवतीर्थनगर (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३५ : थेरगाव, बेलठिकानगर-पडवळनगर-पवारनगर (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३६ : थेरगाव, गणेशनगर-संतोषनगर-पद्मजी पेपर मिल (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३७ : ताथवडे-पुनावळे (१. एससी महिला, २. महिलाला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३८ : वाकड (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ३९ : पिंपळेनिलख-वाकड (१. एससी, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४० : पिंपळेसौदागर (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४१ : पिंपळेगुरव गावठाण-वैदुवस्ती-जवळकरनगर (१. एससी महिला, २. एसटी महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४२ : कासारवाडी-फुगेवाडी (१. महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४३ : दापोडी (१. एससी महिला, २. महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४४ : पिंपळेगुरव-काशिदनगर-मोरया पार्क (१. एससी, २. एसटी महिला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४५ : नवी सांगवी (१. महिला, २. खुला, ३. खुला)
प्रभाग क्रमांक ४६ : जुनी सांगवी (१. एससी, २. महिला, ३. महिला, खुला)