Home ताज्या बातम्या निवडणुका लवकर होणार आता अंतिम प्रभाग रचना जाहीर, इच्छुक लागले तयारीला

निवडणुका लवकर होणार आता अंतिम प्रभाग रचना जाहीर, इच्छुक लागले तयारीला

0

पिंपरी,दि.१४ मे २०२२(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यास राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि. १२ ) मंजुरी दिली असून अंतिम आराखडाही जाहीर झाला आहे. प्रारुप रचनेमध्ये तब्बल ५ हजार ६८४ हरकती व सूचनांचा पाऊस पडल्यानंतरही केवळ मोजके बदल करण्यात आले असून बदलांसह अंतिम आराखडा महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामुळे इच्छुकांना नेमक्या कोणत्या परिसरात निवडणूक लढावयची आहे, हे स्पष्ट झाले आहे.तीन सदस्यांचे ४५ व चार सदस्यांचा एक असे एकूण ४६ प्रभाग आहेत. एकूण १३९ नगरसेवकांची संख्या असणार आहे. राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी मिळताच महापालिकेच्या निवडणूक विभागाने हा अंतिम आराखडा प्रसिद्ध केला आहे. प्रारुप आरखड्यामध्ये प्रभागप्रभाग क्रमांक २, ३, ५, ७, ११, १२, २६ आणि २७ मध्ये बदल करण्यात आले आहेत. बदलानुसार काही भाग जोडून शेजारच्या प्रभागाला जोडण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रभागांच्या लोकसंख्येत बदल झाला आहे. हे किरकोळ बदल वगळता इतर कोणत्याही प्रभागात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग लगेच कामाला लागले आणि १७ मे पर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करणार होते. पण, त्याअगोदरच पिंपरी-चिंचवड महापालिकेची प्रभाग रचना (ता.१३ मे) जाहीर झाली. त्यामुळे इच्छुकांचा प्रतिक्षा संपली आता तयारीला लागण्याचा मार्ग मोकळा झाला,१७ तारखेला राजपञित प्रभाग रचना प्रकट होताच दोन दिवसात किंवा त्याच दिवशी आरक्षण ही जाहिर करण्यात येईल त्यामुळे इच्छुक उमेदवारांना आता निवडणुका जुन मध्ये होऊ नाही तर पावसाळ्या नंतर माञ नेमके कुठे काम करायच कुठुन उभे राहयचे हे माञ निश्चित करता येणार त्यामुळे पुन्हा एकदा निवडणुकीच वातावरण तापायला सुरवात होणार.पालिकेने पाठवलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या आराखड्यात ४६ पैकी फक्त आठ प्रभागांच्या रचनेत किरकोळ बदल आयोगाने केला आहे. त्यामुळे ती राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोईची ठरणार आहे.हरकती घेतल्याने भाजपला अनुकुल प्रभाग रचना होईल असे भाजपाला वाटत होते माञ भाजपचा डाव फेल ठरला,आणि अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आयोगाने या निवडणुका पावसाळ्यानंतर घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली आहे. त्यावर १७ तारखेला सुनावणी आहे. तेव्हाच ही निवडणूक कधी होणार हे स्पष्ट होणार आहे. २०१७ ला चार सदस्यांचे ३२ प्रभाग होते. यावेळी तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक होणार असल्याने प्रभागांची संख्या ४६ वर गेली आहे. त्यातील शेवटचा ४६ नंबरचा प्रभाग हा चार सदस्यीय आहे. त्यामुळे ओघाने तोच सर्वात मोठा म्हणजे मतदारसंख्या सर्वाधिक (४६,९७९) असलेला प्रभाग आहे.१ फेब्रुवारीला नव्याने तयार करण्यात आलेली तीन सदस्यीय प्रभाग रचना राष्ट्रवादीला अनुकूल आहे, अशी चर्चा झाल्याने त्यावर भाजपकडून हरकतींचा पाऊस पडला होता. पाच हजार ६८४ हरकती घेण्यात आल्या. त्यावर सुनावणी घेऊन ती अंतिम करण्यासाठी २ मार्चला राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती. दरम्यान, प्रभाग रचनेचे अधिकार स्वताकडे घेण्याचा कायदा राज्य सरकारने केला. त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने पुढची निवडणूक प्रक्रिया म्हणजे प्रभाग रचना अंतिम करण्याचे काम खोळंबले होते.सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश देऊन निवडणूक जाहीर करण्यास सांगितल्याने राज्याचे मुख्य निवडणूक आय़ुक्त यु.पी.एस. मदान यांनी पिंपरी पालिकेची अंतिम प्रभाग रचना आज जाहीर केली. त्यामुळे निवडणुकीचे निम्मे चित्र स्पष्ट झाले आहे.

Previous articleBREAKING::ठाकरे सरकारचा निर्णय-राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ
Next articleमाजी गारठले तर भावी थंडावले निवडणूक लोकशाही पद्धतीने मात्र जोर हुकुमशाहीचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen − thirteen =