Home ताज्या बातम्या 17 मे ला अंतिम प्रभाग रचना होणार प्रसिद्ध ; जुन मध्ये निवडणुका...

17 मे ला अंतिम प्रभाग रचना होणार प्रसिद्ध ; जुन मध्ये निवडणुका होण्याची दाट शक्यता ?

147
0

पिंपरी चिंचवड,दि.10 मे 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महापालिका निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे आदेश- 11 मे अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण,12 मे पर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यता पाठवावी,17 मे अंतिम प्रभाग रचना अंतिम प्रसिद्ध करावी,17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राज पत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.राज्य निवडणूक आयोगानं राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसदर्भात महत्वाचं परिपत्रक महापालिकेना पाठवले आहे. नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, मुंबई आणि ठाणे महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी अंतिम प्रभाग रचना शासनाच्या राजपत्रात 17 मे रोजी प्रसिद्ध करण्यात येतील, असं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. राज्यात 14 महापालिकांच्या निवडणुकांचं बिगूल आगामी काळात वाजण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भातील निकाला नंतर महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या हालचालीना वेग आला आहे. दोन आठवड्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासं सांगितल्या होत्या. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं हे परिपत्रक जारी केलं आहे. आजच सुप्रीम कोर्टानं मध्य प्रदेश सरकारला झटका देत तिथं देखील स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुका जाहीर करण्यास सांगितलं आहे. 10 मार्च 2022 ला राज्य सरकारनं कायदा करत प्रभाग रचना निश्चित करण्याचं काम त्यांच्याकडे घेतलं होतं. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पुन्हा राज्य निवडणूक आयोगचं प्रभाग रचना जाहीर करणार आहे. 14 महापालिकांच्या निवडणुकीची प्रभागरचना जाहीर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं 17 मे ही तारीख निश्चित केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं दोन आठवड्याचा वेळ दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगानं महापालिका निवडणुकांच्या कामांना गती दिली आहे.राज्यातील 14 महापालिकांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. राज्यातील नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली, मुंबई आणि ठाणे या महापालिकांची मुदत संपली आहे. या महापालिकांची प्रभाग रचना 17 मे रोजी जाहीर होणार आहे.सर्वोच्च न्यायालयात ओबीसी राजकीय आरक्षणावरील सुनावणी 12 जूनला होणार आहे. तो पर्यंत राज्य सरकार ट्रिपल टेस्ट आणि इम्पिरिकल डाटा तयार करुन सादर करणार का हे पाहावं लागणार आहे.तदवतच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाः नंतर निवडणुका दोन टप्यात होतील असे चिञ एकदंरीत दिसत आहेत. अंतिम प्रभाग रचना जाहीर होताच जूनच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि निवडणूक इस्त्री जाण्याची दाट शक्यता आहे

कोरानाचं संकट आणि नंतर ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा झटका यामुळे लांबलेल्या राज्यातल्या स्थानिक स्वराज्य निवडणुका आता आणखी लांबवता येणार नाहीत. महानगपालिकेच्या निवडणुका आता तातडीनं घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळेच महापालिका निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे महत्वाचे आदेश दिले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांच्या सर्व सूचनांचा सखोल अभ्यास करून 14 महानगरपालिकांच्या प्रभाग रचना अंतिम केल्या आहेत

महापालिका निवडणूक संदर्भात राज्य निवडणूक आयोगाचे महत्त्वाचे आदेश- 11 मे अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण,12 मे पर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यता पाठवावी,17 मे अंतिम प्रभाग रचना अंतिम प्रसिद्ध करावी,17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना यादी शासन राज पत्रात अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे.

कोणत्या महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत?
मुंबई,ठाणे,पुणे,पिंपरी चिंचवड,नाशिक,नागपूर,कल्याण डोंबिवली,नवी मुंबई,वसई विरार,उल्हासनगर,औरंगाबाद,
कोल्हापूर,सोलापूर,अकोला,अमरावती
महानगर पालिका निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात ज्या महापालिकांना सहा महिने किंवा एक वर्ष झालं आहे त्यांची निवडणुक घेतली जाणार आहे. नुकतीच मुदत संपलेल्या महापालिकांची निवडणूक दुस-या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.एकत्रित निवडणूक आल्यानं निवडणुक आयोगावर तसेच शासकीय यंत्रणेवर ताण पडू शकतो त्यामुळे अशी रणनीती आखण्याचं काम सुरु आहे

Previous articleखास पाणीपुरीचा बेत-विकासनगर मध्ये भावी नगरसेवक संतोष म्हस्के यांच्या वाढदिवसा निमित्त ८ मे ला कार्यक्रमाचे आयोजन
Next articleरावेत येथील अनधिकृत व्यवसायिक पत्राशेडवर पि.चि.मनपा कडुन कारवाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight + one =