Home ताज्या बातम्या Breaking – आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल-आमदार महेश लांडगे...

Breaking – आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल-आमदार महेश लांडगे यांनी दिली माहिती

0

पिंपरी,दि.१४ एप्रिल २०२२ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-चिंचवड विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप यांना तातडीने बाणेर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तसेच भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी माहिती देताना सांगितले की, लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच जगताप हे कार्यकर्त्यांच्या भेटीला समोर येतील अशी माहिती महेश लांडगे यांनी दिली आहे.आमदार जगताप यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेत उपचार घेतले होते. त्यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांच्या प्रकृती विषयी  कार्यकर्त्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. आमदार महेश लांडगे काय बोले पहा  खालील व्हिडीओ मध्ये

Previous articleभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मा.नगरसेवक मोरेश्वर (भाऊ) भोंडवे यांनी दिल्या शुभेच्छा
Next articleपिंपरी चिंचवड- रविवारी उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 11 =