नाशिक(प्रजेचा विकास) :- श्रीराम मंदीराच्या नावावर मत मागून भाजप उत्तरप्रदेश विधानसभेपासून तर संसद आणि राष्ट्रपती भवनापर्यत सत्ता मिळविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी मनात आणल तर राममंदीर होऊ शकतं. त्यांनी राम मंदीराबाबत कायदा बनवावा. शिवसेना कोऱ्या कागदावर समर्थनाची सही करेल. भाजपला राममंदीराची आठवण करुन देण्यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे अयोध्येला जाणार आहेत.राम मंदीर हा श्रद्धेचा, भावनेचा विषय आहे. यावर कोणतंही न्यायालय निर्णय देऊ शकत नाही. या विषयावर आम्ही कोर्ट मानतं नाही. असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राउत यांनी केला. श्री राउत पत्रकार परिषदेत बोलत होते. संर्पकप्रमुख भाउसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. खासदार संजय राऊत म्हणाले की, अयोध्येला तिहार जेलच रुप आल असून हिंदुंचं आराध्य दैवत सध्या तुरुंगात असल्यासारख वाटत आहे. अयोध्या आणी नाशिकचं भावनीक नातं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सत्ताधारी भाजपला राम मंदीराची आठवण करुन देण्यासाठी आयोध्येला जाणार आहे. त्यासाठी शिवसेनेची “चलो अयोध्या’ तयारी सुरु झाली आहे.नाशिकमधून हजारो लोकांना आयोध्येला यायची इच्छा आहे. मात्र आयोध्येला जाउन पून्हा परत येण्यापर्यतच्या निश्चित कार्यक्रमाचं नियोजन सुरू आहे. 2019 च्या आधी राम मंदिर निर्माण कार्य सुरू होऊ शकतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाची भ्रमंती केली पण अयोध्येला गेले नाही. अशी टिका करीत, राऊत यांनी, भाजपवर जोरदार टिका केली. रामाच्या नावाने मत मागतांना देशात सत्ता नसल्याचे सांगितले. त्यानंतर उत्तरप्रदेशातील सत्ता याच मुद्यावर घेतली. राष्ट्रपतीभवनापासून तर संसद आणि उत्तरप्रदेश विधान सभेत पाशवी बहुमत असतांना मंदीराच्या उभारणीची टाळाटाळ कशासाठी ? असा प्रश्न करीत, त्यांनी आयोध्येतील भव्य मेळाव्याच्या तयारी सुरु झाल्याचे सांगितले एकट्या उत्तरप्रदेशातून राम मंदीराच्या मेळाव्याला लाख-दिड लाख लोक येतील.याशिवाय महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने नागरिक आयोध्येला जाणार असल्याचे सांगितले. मनसे किंवा अन्य पक्ष काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नाही असे सांगतांनाच, हिंदूंच्या कत्तली करा असं बोलणाऱ्या ओवेसींकडून शहाणपणा शिकण्याची आम्हाला गरज नाही. अशी टिका केली. जायकवाडीला पाणी सोडण्यावरुन मुख्यमंत्र्याकडे बोट दाखवित पाण्यावरून राजकारण कमी करावं. मराठवाड्याला पाणी देण्यावरून होत असलेल्या वादात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा. पाण्यावरून युद्ध नको अस सांगितलं.