विकासनगर-किवळे,दि.07 मार्च 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- श्री दिपकभाऊ मधुकर भोंडवे युवामंच आयोजित 06 मार्च रोजी खेळ रंगला पैठणीचा अर्थात न्यू होम मिनिस्टर सादरकर्ते विजय पानसरे हा कार्यक्रम प्रभाग क्रमांक 24 – विकास नगर या ठिकाणी पार पडला,मोठ्या प्रमाणामध्ये तब्बल दोन ते अडीच हजार महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला थेट खेळ रंगला पैठणीचा खेळात 1238 महिलांनी फॉर्म भरून सहभागी झाले तर बाकी च्या महिलांनी कार्यक्रमाचा आनंद सहभागी होऊन आनंद घेतला.अनेक महिलांकडुन श्री दीपक भाऊ मधुकर भोंडवे यांनी हा खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम घेऊन आमच्यासारख्या काम करणाऱ्या महिला व घरी असलेल्या महिलांना कुठेतरी मनमोकळे आनंद व्यक्त करण्याची संधी या कार्यक्रमामुळे मिळवुन दिली.सहभागी होऊन एक वेगळा आनंद घेण्याचा संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल श्री दिपकभाऊ मधुकर भोंडवे यांचे अनेक महिलांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमांमध्ये चेतन कुमार भाऊजी आणि निलेश पापट भाऊजींनी मिमिक्री करत वेगवेगळे खेळ घे कार्यक्रमाची शोभा व रंगत वाढवली. यावेळी दिपकभाऊ मधुकर भोंडवे बोलताना म्हणाले कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांच्या चेहर्यावरचा आनंद पाहून खरा आनंद मला मिळाला असाच माझा प्रभाग सतत आनंदी राहो अशी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो आपण सर्वजण असेच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपल्या प्रभागाच्या विकासाकडे लक्ष देऊन आपल्या सर्वांच्या सोबतीने आपला प्रभाग स्मार्ट बनवूया आणि आपल्या प्रभागांमध्ये येता 13 मार्च रोजी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. कोरना काळात ज्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.तसेच शिक्षण पुर्ण होऊनही नोकरी नाही. घरांमध्ये वाढती लोकसंख्या पाहता अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या वाढल्यात पण नोकरी मध्ये संधी नसल्याने अनेक तरुण बेरोजगार आहे या सर्वांसाठी आपण समीर लॉन्स या ठिकाणी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. तरी आपल्या प्रभागातील बेरोजगार तरुण-तरुणी असतील या सर्वांच्या हाताला काम हवे. म्हणून आपण हा नोकरी महोत्सवाचे आयोजन केले आहे तरी आपण सर्वांनी आपले मुलं-मुली, भाऊ-बहीण या सर्वाना नोकरीची संधी मिळावी.म्हणुन त्यांना समीर लॉन्स या ठिकाणी पाठवा.25 ते 30 नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आपल्याला मिळेल. त्यामुळे आपल्या सर्वांना नोकरीची संधी उपलब्ध होईल त्यामुळे आपण या नोकरी महोत्सवात हजर राहून ह्या संधीचा फायदा घ्यावा असे मत व्यक्त केले तसेच आलेल्या सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्स्फुर्तपणे मोठ्या प्रमाणात पार पडला या कार्यक्रमामध्ये विजेत्या महिलांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मीनाक्षी निलेश कुंभार यांना टू व्हीलर एक्टिवा व मानाची पैठणी व्दितीय क्रमांकाचे बक्षीस आम्रपाली बाळू अल्हाट यांना एलईडी कलर टीव्ही व मानाची पैठणी तर तृतीय क्रमांकांचे बक्षीक्ष निधी मलगे यांना फ्रिज व मानाची पैठणी चतुर्थ क्रमांकाचे बक्षीस जिजाबाई पाटील यांना वॉशिंग मशीन व मानाची पैठणी मिळाली. तसेच सात महिलांना लकी ड्रॉ मधुन सात पैठणी मिळाल्या. आलेल्या सर्व महिलांना एक वेगळा आकर्षक बक्षीस देण्यात आले त्यामुळे महिला दिना निमित्त खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम हा आनंददायी उत्स्फूर्तपणे पार पाडला.यावेळी अनिलशेठ चव्हाण,संजय चव्हाण,भुपेद्र पटेल,सोमनाथ भोंडवे,महेश लोभे,वंदनाताई तरस,मंगलाताई अनिल चव्हाण,माधवी चव्हाण, सारीकाताई अढाव,संतोष भोंडवे,सुनील भोडंवे,श्री दिपकभाऊ मधुकर भोंडवे युवा मंच चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.