Home ताज्या बातम्या लता मंगेशकर यांच्या निधनामुळे उद्या 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात दुखवटा म्हणून...

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे उद्या 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर

0

पिंपरी,दि.06 फेब्रुवारी 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्र्टाचे राज्यपालांच्या आदेशाने सार्वजनिक सुट्टी जाहीर भारतरत्न गानसम्राज्ञी कु.लता मंगेशकर यांचे आज रविवार दि . ६ फेब्रुवारी २०२२ रोजी दुःखद निधन झाले . त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली असून , या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी , परक्राम्य संलेख अधिनियम , 1881 ( सन 1981 चा अधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे . प्रति , सदर शासन अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे . सदर शासन अधिसूचना डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे . महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुट्टी जाहिर करण्यात आली आहे.

Previous articleAIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.बॅ.असदुद्दीन ओवैसी यांचावर झालेल्या गोळीबाराचा निषेर्धात पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आले
Next articleहिजाबवरून वाद वाढला, कर्नाटकात 3 दिवस शाळा बंद, हायकोर्टात आज सुनावणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seven + 15 =