पिंपरी-चिंचवड(प्रजेचा विकास न्युज प्रतीनीधी)-पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, वाढते भौगोलिक क्षेत्र तसेच, वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता शहरावर वाहतुकीचा ताण वाढणार आहे. पिंपरी-चिंचवड व पुणे शहराची भौगोलिक संलग्नता विचारात घेऊन दिर्घकालीन सुसंगत धोरण तयार करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने परिवहन कक्षाची (ट्रॉन्सपोर्टशन सेल) स्थापना केली आहे.
पिंपरी-चिंचवड व पुणे शहरांची भौगोलिक संलग्नता विचारत घेऊन वाहतुक धोरण निश्चित केली जाणार आहे. पीएमपीएल बस, नॉल मोटोराईज ट्रान्सपोर्ट (एनपीटी), बीआरटी (जलद बस सेवा), संयुक्तिक वाहतुक नियोजन आराखडा (कॉम्प्रेहेसिव्ह मोबॉलिटी प्लॅन-सीएमपी) व पुणे मेट्रो या सार्वजनिक वाहतुकीशी निगडीत सर्व पर्यायांचे दिर्घकालीन धोरण निश्चित केले जाणार आहे. हे धोरण दोन्ही शहरासाठी सुसंगत असणार आहे. त्याचे योग्य पद्धतीने नियोजन करण्यासाठी परिवहन कक्षाची स्थापना पालिकेने केली आहे.
या कक्षासाठी स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे, उपअभियंता संजय साळी, कनिष्ठ अभियंता विजय सोनवणे, अनिल भोईर यांची नियुक्त करण्यात आली आहे. या कक्षाचे कामकाज आयुक्तांच्या नियंत्रणाखाली चालणार आहे. सवणे हे कक्षाचे प्रमुख असणार आहेत, या संदर्भातील परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी (दि.19) काढले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेमध्ये परिवहन कक्ष पूर्वीच स्थापन करण्यात आलेला आहे.
Home ताज्या बातम्या पालिकेत परिवहन कक्षाची स्थापना : पिंपरी-चिंचवड, पुणे शहराच्या सुसंगत वाहतुकीसाठी