Home ताज्या बातम्या जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चामध्ये राज्यात चौथा तर मराठवाडा विभागात लातूर जिल्हा पहिला

जिल्हा वार्षिक योजनेच्या खर्चामध्ये राज्यात चौथा तर मराठवाडा विभागात लातूर जिल्हा पहिला

0

लातूरदि. 22जानेवारी 2022(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- :- लातूर जिल्ह्याने नाविन्यपूर्ण योजनेत Umang Autism and Metastability Center (Sensory Garden) हे संपूर्ण देशात केरळ राज्यानंतर लातूर जिल्ह्याने सुरु केले याचे कौतुक करून इतर जिल्ह्याने या अत्यंत चांगल्या योजनेचे अनुकरण करावे असेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच लातूर जिल्हा खर्चामध्ये मराठवाडा विभागात पहिला, तर राज्यात चौथ्या क्रमांकावर असल्याबद्दलही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशंसा केली. 2022-23 च्या 290 कोटीच्या प्रारूप आराखड्यास तत्वतः मंजुरी दिली.

जिल्ह्याची जिल्हा वार्षिक योजना 2022-23 च्या प्रारुप आराखड्याला मान्यता देण्यासाठीची राज्यस्तरीय बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली.

या बैठकीस राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतीक कार्य तथा लातूर जिल्हा पालकमंत्री अमित देशमुख, राज्याचे पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भुकंप पुर्नवसन, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बाबुराव बनसोडे, आमदार धीरज देशमुख, आमदार अभिमन्यू पवार इत्यादी उपस्थित होते. तर आमदार विक्रम काळे हे औरंगाबाद येथून उपस्थित होते. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त अमन मित्तल, जिल्हा नियोजन अधिकारी म.शं.दुशिंग व जिल्ह्यातील इतर यंत्रणेचे अधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

Previous articleजिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनेमध्ये उस्मानाबादला १५ कोटींची वाढ करून २९५ कोटींचा निधी मंजूर – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleजिल्ह्याच्या विकास कामांना वाढीव निधी उपलब्ध करून घेवू – पालकमंत्री अशोक चव्हाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

10 − one =