Home ताज्या बातम्या महाराष्ट्र राज्याची पूजा वाल्हेकर हिने राष्ट्रीय प्रो किकबॉक्सइंग टायटल बेल्ट पटकावला,तर सर्व...

महाराष्ट्र राज्याची पूजा वाल्हेकर हिने राष्ट्रीय प्रो किकबॉक्सइंग टायटल बेल्ट पटकावला,तर सर्व सामान्य विजेतेपद महाराष्र्टराज्याकडे

0

चिंचवड,दि.६ जानेवारी २०२२(प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथे २७ ते ३० डिसेंबर २०२१ दरम्यान आयोजित वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडेरेशन व्या मान्यतेने अमॅच्युअर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र कडून राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा आनंदमयी आणि उतसाही वातावरणात बालेवाडी येथे पार पडल्या,स्पर्धेचे उद्घाटन खासदार श्रीरंग (आप्पा) बारणे, डि.सी.पी मंचक इप्पर , संतोष दादा बारणे चेरमन अमॅच्युअर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र, अमॅच्युअर स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन महाराष्ट्र चे विद्यमान अध्यक्ष संतोष म्हात्रे,भरत वाल्हेकर चेरमन पिंपरी चिंचवड किकबॉक्सिंग असोसिएशन यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.

वाको इंडिया किकबॉक्सिंग फेडरेशन चे विद्यमान अध्यक्ष अनिल कल्याण, महासचिव संतोष म्हात्रे, वरिष्ठ उपाध्यक्ष वसीम अहमद, वरिष्ठ उपाध्यक्ष आनंद बाळू, उपाध्यक्ष उमाकांता, उपाध्यक्ष महेश कुशवाह, सहसचिव रवीं सह, भारतीय निवड समितीचे अध्यक्ष मोंटू दास, कोचिंग समिती अध्यक्ष हर्ष दहिया, कोषाध्यक्ष सय्यद इफ्तिकार हुसेन, जॉईंट सेक्रेटरी जोहर, दीपक प्रसाद, खेमेश्वरी साहू आधी मान्यवर उपस्थित होते

सदर स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे –

कॅडेट्स कॅटेगरी पहिले स्थान – महाराष्ट्र दुसरे स्थान कर्नाटक तिसरे स्थान मणिपूर

जुनिअर कॅटेगरी- पहिले स्थान महाराष्ट्र दुसरे स्थान- कर्नाटक तिसरे स्थान- राजस्थान

सिनिअर कॅटेगरी पहिले स्थान- महाराष्ट्र ,दुसरे स्थान- कर्नाटक, तिसरे स्थान – मणिपूर

सदर राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे सर्व सामान्य विजेते पद महाराष्ट्र राज्याने पटकावले तर उपविजेते पद कर्नाटक राज्याने पटकावले व तृतीय स्थान मणिपूर

राज्याने मिळवले. सदर स्पर्धे मध्ये राष्ट्रीय प्रो किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये मुलींच्या गटात महाराष्ट्र राज्याची पूजा वाल्हेकर हिने राष्ट्रीय प्रो किकबॉक्सइंग टायटल बेल्ट पटकावले, तसेच मुलांच्या -६५ वजन गटात महाराष्ट्रच्या परवेज शेख याने प्रो किकबॉक्सइंग टायटल बेल्ट पथकावले तर + ६५ वजन गटात दिल्लीच्या जमशेद शेख याने प्रो किकबॉक्राइंग टायटल बेल्ट पथकावले. स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ साठी नगरसेवक, मा. कुंदनशेठ गायकवाड, देहूरोड पोलीस स्टेशन चे पी आय राजेन्द्र निकाळजे, उद्योजक शिवाजीशेठ बारणे, युवा नेते सुनीलशेठ लांडे पाटिल, संदिपशेठ शेलार महाराज,

पि.ची बजरंग दल प्रमुख नाना सावंत, उद्योजक सागरशेठ शेवाळे यांच्या हस्ते पार पडला.

नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये सुमारे १२०० स्पर्धकांनी भाग घेतला. १ रिंग आणि ४ तातागी ४ दिवस सतत काम करत होते. स्पर्धे दरम्यान संघटनेने कोविड-१९ मार्गदर्शक तत्त्वे आणि सरकारी प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केले. स्पर्धेतील सर्व विजेता खेळाडूंची आगामी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.

 

Previous articleआता तरी सुधरा पुणेकरांनो, आता तरी सुधरा, सात वर्षाच्या कार्तिक ने केले पुणेकरांना आवाहन !
Next articleदिपक भोंडवे यांनी पञकारांचा पञकारदिना निमित्त केला सन्मान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × four =