पिंपरी, दि.08 ऑक्टोबर 2021 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-विक्रम कांबळे) :– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखाने, आणि तीन बहीणी यांच्या घरी तसेच त्यांचे सुपुत्र पार्थ पवारकार्यालयावर काल सकाळी आयकर विभागणी छापा टाकला. ही कारवाई अजुनही सुरुच आहे.
यांच्यावर सुडबुद्दीने आयकर विभागानं छापेमारी केली. याविरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पिंपरी आंबेडकर पुतळ्यासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या हुकुमशाही विरोधात घोषणबाजी करण्यात आली.
शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. “आम्ही सदैव अजितदादांसोबत”, we support ajitdada, “आमची ताकद , आमचा अभिमान अजितदादा” असे फलक आंदोलकांनी हातामध्ये होते. हाताला काळी फित बांधत निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळ आमदार अण्णा बनसोडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, अजित गव्हाणे, विक्रांत लांडे, समीर मासुळकर, राजू बनसोडे, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, नगरसेविका वैशाली काळभोर, निकिता कदम, पोर्णिमा सोनवणे, संगीता ताह्मणे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, काळूराम पवार, राजेंद्र साळुंखे, प्रसाद शेट्टी, प्रवक्ते फजल शेख, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, सारिका पवार, कविता खराडे, गंगा धेंडे आदी कार्यकर्ते आंदोलन सहभागी झाले आहेत.