तळेगाव,दि.24 मे 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-तळेगाव दाभाडे येथील स्टेशन परिसरात फळे व भाजी वाल्यांना बसण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी प्रशस्त जागा उपलब्ध करून दिल्यामुळे तळेगावातील रस्त्यावरील गर्दी कमी झाली असल्याचे आढळुन येत आहे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मावळात लाॅकडाऊन करण्यात आलेला आहे, वैद्यकीय सेवा वगळता भाजी किराणा फळे दूध आदी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत खुले ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत,त्यामुळे तळेगाव मधील जिजामाता चौक ते स्टेशन रस्त्यावर फळे व भाजी विक्रेते मोठ्या संख्येने दुकाने लावतात या रस्त्यावर सकाळी अकरा वाजेपर्यंत नागरिकांची गर्दी होत होती तसेच पॅन्डामीक परस्थितीतही वाहतूक कोंडीची समस्या देखील निर्माण झाली होती त्याच्यात नागरिकांची होणारी गर्दी व वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी केवळ येथे बसणाऱ्या भाजी व फळे विक्रेत्यांना येथून उठवुन समस्या सुटणार नव्हती म्हणुन त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न लक्षात घेऊन अडचणी निर्माण होऊ नये नागरिकांना देखील व्यवस्थित भाजी व फळे मिळावीत यासाठी आमदार सुनील शेळके यांनी पुढाकार घेत तळेगाव मध्ये प्रशस्त भाजी व फळ विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा आणि वाहन पार्किंगची व्यवस्था करून दिली. तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवण्यात आले.