पुणे,दि.०६ एप्रिल २०२१(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौर पदी रिपब्लिकन पक्षाचा सौ सुनिता परशुराम वाडेकर यांची निवड करण्यात आली भाजप रिपाई युतीची पुणे महानगरपालिकेमध्ये एक हाती सत्ता असल्याने उपमहापौरपदाची आजची निवडणूक ही फक्त एक औपचारिकता होती. निवडणुकीच्या वेळी महानगरपालिकेमध्ये पुण्यनगरी चे खासदार गिरीश बापट उपस्थित होते. भाजपा ने दिलेला शब्द पाळला असून येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपा व रिपाई यूती मोठ्या जोमाने काम करणार असे बापट साहेब म्हणाले याप्रसंगी सौ सुनिता वाडेकर यांना बापट साहेबांनी पेढा भरवुन शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी उपस्थित पुण्यनगरी चे प्रथम नागरीक महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृहनेता गणेश बिडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर, डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका फरजाना शेख, नगरसेविका सोनाली लांडगे, आयुब शेख, मंदार जोशी, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, शैलेंद्र चव्हाण, मोहन जगताप, शशिकला वाघमारे, निलेश आल्हाट, बसवराज गायकवाड, बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, हालीमा शेख, महादेव साळवे, अविनाश कदम, उद्धव चिलवंत, संतोष खरात, दादासाहेब वारभुवन पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.