Home ताज्या बातम्या देहु- तुकाराम बीज सोहळा 50 वारकरी/ भाविकांत साजरा करण्याची जिल्हाधिकारीनी दिली परवानगी

देहु- तुकाराम बीज सोहळा 50 वारकरी/ भाविकांत साजरा करण्याची जिल्हाधिकारीनी दिली परवानगी

0

देहुरोड,दि27 मार्च 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- श्रीक्षेत्र देहू येथे दिनांक 30 मार्च 2019 रोजी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन तुकाराम बीज कार्यक्रम सोहळा साजरा होणार आहे. मागील वर्ष वगळता दर वर्षी सदर सोहळ्यास महाराष्ट्रातून 3 ते 4 लाख भाविक श्रीक्षेत्र देहू ला जमतात. पिंपरी-चिंचवड अथवा संपूर्ण महाराष्ट्रातच covid-19 (कोरोना)च्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढला असल्याने तुकाराम बीज कार्यक्रमाला जर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली तर सदर कोविड-19 या विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होईल त्याकरिता जिल्हाधिकारी पुणे यांनी केवळ 50 वारकरी भाविकांच्या उपस्थितीत प्रतीकात्मक पद्धतीने सदर कार्यक्रम सोहळा साजरा करण्याची परवानगी दिली आहे

वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ वारकरी श्री बंडा तात्या कराडकर यांनी अचानक पणे दिनांक 29 मार्च 2019 रोजी चलो देहू चे आव्हान सोशल मीडिया व मुलाखतीतून केले होते त्यामुळे वारकरी संप्रदायात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असुन सदर आव्हानामुळे वारकऱ्यांची गर्दी जमून covid-19 च्या विषाणूचा महाराष्ट्रात अधिक जोरात प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या अनुषंगाने श्री कृष्णप्रकाश पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी स्वतः पुढाकार घेत देहू व आळंदी परिसरातील वारकरी संप्रदायातील प्रमुख वारकरी महाराज तसेच वारकरी संस्था पदाधिकारी श्री बंडातात्या कराडकर यांच्या आव्हानाला सुरुवातीस पाठिंबा देणारे वारकरी यांच्याशी वारंवार संवाद साधत आळंदी येथे तसेच पोलीस आयुक्तालयात बैठकी घेतल्या आंदोलनामुळे कोविड-19 च्या प्रसाराच्या धोक्याची जाणीव करून दिली.
आज दिनांक 27 मार्च 2019 रोजी आयुक्तालय येथे देहू येथील तुकाराम महाराज मंदिर विश्वस्त तसेच आळंदी येथील प्रमुख वारकरी पदाधिकारी यांची बैठक झाली, सदर बैठकीमध्ये आळंदी येथील सर्व वारकरी यांनी तसेच जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज मंदिर देहू चे विश्वस्त मंडळ यांनी आंदोलनामुळे covid-19 च्या प्रादुर्भाव वाढू शकतो व वारकरी संप्रदायाच्या व संपूर्ण महाराष्ट्राचा समाजाच्या मानवतेच्या दृष्टीने श्री बंडातात्या कराडकर यांचे आंदोलनास पाठिंबा देणार नसल्याचे व शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तुकाराम बीज कार्यक्रम सोहळा पार पाडणार असल्याचे सांगितले आहे. तरी पोलिस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी श्री क्षेञ देहुगाव परिसर, विठ्ठल वाडी,माळवाडी येलवाडी,सुदवडी व श्रीक्षेत्र भंडारा डोंगर परिसर भागात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(1)(3) अनन्वय दिनांक 28 मार्च 2021 रात्री 12.00 ते दिनांक 30 मार्च 2021 चे 12.00 वाजे पर्यंत संचारबंदी चे आदेश लागू केले आहेत त्यामुळे कोणीही भाविक वारकरी यांनी देहू येथील तुकाराम बीज कार्यक्रमासाठी येऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे तुकाराम बीज कार्यक्रमासाठी परंपरेने जाणारे सेवकरी व मानकरी यांनी श्री क्षेत्र देहू संस्थांकडून पासेस प्राप्त करून सदर कार्यक्रमास उपस्थिती लावावी

Previous articleयश साने ची आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडे मागणी सामाजिक,राजकीय कार्यकर्ते व पत्रकारांनाही कोरोना लस तातडीने मिळावी.
Next articleमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या संगणक प्रणालीवर सायबर हल्ला; सायबर गुन्हेगारी कक्षाकडे तक्रार दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen + two =