संपादकीय-पिंपरी,दि.19 मार्च 2021(प्रजेचा विकास संपादक-विकास कडलक):- पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक शहर असल्याने अनेक वर्षापासून लोक येथे स्थलांतरित होतात. त्यामुळे अनेक समस्या भेडसावतात, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत त्या येतात व त्यावर निवारण करण्यासाठी नगरसदस्य व प्रशासकीय अधिकारी काम करतात. पण एकञ निर्णायक गोष्टी करणे हे शक्य होत नाही कारण विविध पक्षातील नगरसदस्य,सत्ताधारी व विरोधक यांच्यात नेहमीच वर्चस्वाची चुरस पाहावयास मिळते.या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवण्याचे काम मात्र पत्रकार करतात, विरोधीपक्ष खंबीर नसल्यास विरोधीपक्षाची भूमिका बजावत. जर चांगले निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतले तर त्यावर त्यांचे स्वागत निहाय गोष्टी प्रसिद्धीस आणतात. मात्र पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीत तसे पहावयास मिळत नाही. अनेक दिग्गज दैनिक, साप्ताहिक, टीव्ही चॅनल आत्ताचे इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून न्यूज पोर्टल,युट्युब असे असंख्य पत्रकार पहावयास मिळतात. ते फक्त मी कसा चांगला आणि माझे संबंध कसे चांगले,मी इतक्या वर्षापासून आहे, मी हे करू शकतो,अशा अनेक भानगडीत अडकलेल्या अवस्थेत अनेक पत्रकार दिसून येतात. तर काही पत्रकार राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत तर काही राजकीय संघटनांशी संलग्न पत्रकार संघातील घटक आहेत.त्यामुळे निपक्षपातीपणे पत्रकारिता दिसून येत नाही, प्रत्येक जण बातमी पेक्षा स्वतःला दिवस घालवु प्रमाणे स्वतःचे म्हणजेच पत्रकार म्हणून स्वतःचे अस्तित्व धोक्यात घालवु पाहत आहे, या सर्व गोष्टी मुळे व्यक्तिशः एक वेगळा चष्मा पत्रकारांच्या विचारांवर पहावयास मिळतो. याचा परिणाम चालू घडामोडी, लोकशाही भक्कम करण्यासाठी संविधानिक मार्गाचा विसर पडणार्यांना वेळोवेळी जाणीव होत नाही.
बातम्यांवर,जाहिरातीवर याचा परिणाम होतो व यामुळे अनेक दैनिक साप्ताहिक टि.व्हि चॅनल डबघाईस आले आहेत. जुने पत्रकार नव्यांना सामावून घेत नाहीत तर नवे जुन्यांना जुमानत नाही त्यामुळे ही वर्चस्वाची लढाई सुरू आहे. मात्र सर्व पत्रकारांनी याकडे दुर्लक्ष केल्यास,निपक्षपाती पणाचा चष्मा डोळ्यावर, विचारावर, लेखणीवर ठेवल्यास नागरिकांच्या समस्यांकडे तसेच नगर सदस्य आमदार खासदार यांच्याकडून नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोय कडे व लोकहिताच्या कामावर नजर पडेल त्यामुळे शहराच्या विकासासाठी हातभार लागेल सामाजिक राजकीय अशा अनेक समाजसेवक काम करणार्यांवर एक जरब राहिल, त्यामुळे डबघाईस आलेल्या दैनिक, साप्ताहिक,चॅनल हे सर्व पूर्ववत होतील उत्स्फूर्त वाचक,विवर, जाहिराती वाढतील. शेवटी पत्रकार हा पत्रकार असतो समाज पत्रकारांना वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतो पूर्वीचे काही पत्रकार हे सतत विरोधक सत्ताधारी यांना प्रत्येक गोष्टीत आरसा दाखवत त्यामुळे अनेक ऐतिहासिक निर्णय हे पिंपरी-चिंचवड शहरात घडले आहेत.या गोष्टीकडे पत्रकारांनी दुर्लक्ष करता कामा नये. पत्रकारांनी जुन्या नव्या सर्व पत्रकारांनी एकमेकांनी एकमेकांकडून काही शिकावं तर काही विचारांची देवाण-घेवाण करावी म्हणजेच आपापसातील समस्या व हेकी खोरी कमी होईल. लॉबिंग करून फायदा नाही पत्रकारांनी तर मुळीच नाही कारण स्वतःचे अस्तित्व तुम्ही गमावसाल बुद्धीच्या कसोटीवर निपक्षपाती बातम्यांकन करावे सध्या स्पर्धा वर्चस्वात दाखवण्यापेक्षा तुमच्या कोणाचा बातमीने लवकर इम्पॅक्ट पडेल आणि लोकहिताचे काम होईल याची स्पर्धा करावी.तुम्ही आपोआप मोठे व्हाल व प्रसिद्ध व्हाल. दैनिक,साप्ताहिक, इलेक्ट्रॉनिक चॅनल, वेबपोर्टल, युट्युब सर्वांना सामावून घ्या तुमच्याकडे असणाऱ्या संधीच सोने करा. व्यक्तिशः वर्चस्व गाजवण्यात गुरफटून जाऊ नका पत्रकारितेत वयापेक्षा बुद्धी कौशल्याला वाव दिला जातो. त्यामुळे जागृत राहून पत्रकारिता करा.बुद्धीचा विकास आणि आकलन क्षमता, अचूक निर्णय यावर भर देऊन, माझ्या सर्व पत्रकार बांधवांनी घमंड व बुळगा पणा बाजूला ठेवावा नगर सदस्य व त्यांना त्यांची वेळोवेळी जाणीव करून द्या की तुम्ही जनतेचे सेवक आहात त्यासाठी पालिकेत आहात व अभ्यास करण्यास त्यांना भाग पाडा. काहीना माझं बोलणं खोचक वाटत असल्यास दिलगिरी व्यक्त करतो.मात्र तुमच्या व्यक्ती वर्चस्वाच्या लढाईत इतर पत्रकारांचे भवितव्य अंधारात ढकलु नका…सर्व पत्रकारांना पुढील पत्रकारितेच्या कार्यास हार्दिक शुभेच्छा…