भाजपा आमदार राम कदम यांचा दहीहंडीच्या दिवशी बोलताना ताबा सुटला. उपस्थित तरूणाईशी संवाद साधत असतान ते म्हटले होते की एखाद्या मुलीला तुम्ही प्रपोज केले आणि तिने तुम्हाला नकार दिला. तर त्या मुलाने आपल्या आई वडिलांना आणावे, आई वडिलांनी जर सांगितले की आम्हाला मुलगी पसंत आहे तर मुलीला पळवून आणण्यासाठी मी तुम्हाला मदत करेन. १०० टक्के मी मदत करेन हा शब्द देतो असेही राम कदम यांनी म्हटले होते. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्रातल्या महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्नही उपस्थित केला.
भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलीची परवानगी नसेल तरी तिला पळवून नेण्याचे आक्षेपार्ह विधान दहिहंडीच्या उत्सवात केले. हे अत्यंत निषेधार्ह विधान असून जमावापुढे असे वक्तव्य करणे चुकीचे आणि संतापजनक आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी बेटी बचाव बेटी पढाओ अशी घोषणा करत आहेत तर दुसरीकडे राम कदम त्यांच्या विपरीत जाऊन बेटी भागाओचा कार्यक्रम राबवत आहे.
मासाहेब जिजाऊ च्या लेकी आहोत आम्ही,कुठला ही अपमान आम्ही कदापी ही सहन करुण घेणार नाही, व ती शिकवण आजही आमच्यात ठाम आहे.आया बहिनी वर अस बोलणाऱ्याचे आम्ही जाहिर निषेध करतो..अशा शब्दांत मेघा सुरेश रामगुंडे(जिल्हा संघटक-राष्र्टवादी युवती काॅग्रेस चंद्रपुर) यांनी निषेध व्यक्त केला
#निषेध राम कदम
जाहिर निषेध जाहिर निषेध
मेघा सुरेश रामगुंडे(जिल्हा संघटक-राष्र्टवादी युवती काॅग्रेस चंद्रपुर)यांचे निषेध पर प्रतिउत्तर(व्हिडीओ)
आमदार राम कदमयांचे बेताल वक्तव्य