अकोला,दि.10 जानेवारी 2021(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-भगवान महावीर जैन व भगवान गौतम बुद्ध हे समकालीन महामानव कायम मानवजातीच्या उत्थाना करिता कार्य करित होते. त्यांच्या विचारांचा वारसा फार मोठा आहे. अकोला येथील जैन बांधवांनी त्यांचा वारसा फार उत्तम प्रकारे चालविला आहे. त्यांच्या विचारावर चालत जैन बांधवांनी मानवसेवेचे कार्य सुरु ठेवले आहे आणि विचार जोपर्यंत कृतीत उतरत नाही, तोपर्यंत कल्याणकारी व्यवस्था निर्माण होत नाही असे प्रतीपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
गांधी रोड चौक, अकोला येथील प्रसिद्ध जैन मंदिरास मंदिर व्यवस्थापनाने दिलेल्या निमंत्रणावरुन ॲड बाळासाहेब आंबेडकर यांनी सदिच्छा भेट दिली. याभेटीमध्ये त्यांनी संपूर्ण मंदिर व परिसराची पाहणी केली. तसेच खुप जुनी वैचारिक असलेल्या जैन मंदिर येथील ग्रंथालयाची पाहणी केली. तसेच हे साहित्य आणखी ५०० वर्ष कसे टिकवता येईल. त्यासाठी काही मदत पाहिजे असल्यास मी पूर्ण करेल असे आश्वस्त केले. सर्व प्रथम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष मनीभाई लाखटिया यांनी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांचे शाल व श्रीफळ देउन स्वागत केले. याप्रसंगी मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष मणीभाई लाखटिया, उपाध्यक्ष विशालभाई शाह, मंत्री राजुभाई भंडारी, सदस्य महेंद्रभाई देडिया, चेतनभाई मेहता, राजु नगरिया, सुरेशभाई दहेता, रजनीकांत शाह, प्रदीप शाह, प्रकाश भंडारी, कोटक शाह, जोनेद भादानी, मेध शाह, भावीश शाह, प्रवीण मोरे, हिमांशु पारेख, वंचीत बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता डॉ धैर्यवर्धन पुंडकर, प्रदिप वानखडे, सभापती पांडे गुरुजी, डॉ प्रसन्नजीत गवई, गौतम गवई, पराग गवई, गजानन गवई, उपस्थित होते. बैठकीचे संचालन मयुरभाई शाह यांनी केले. यावेळी उपस्थितांनी ॲड बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत हितगुज करून विविध कार्याची माहिती दिली व आभार व्यक्त करुन पुन्हा पुनर्निर्माण कार्य पुर्ण झाल्यानंतर भेट देण्याचे निमंत्रण दिले.