Home ताज्या बातम्या पिंपरी चिंचवड- प्रभाग क्र 16 मध्ये माजी नगरसेवक व भावी नगरसेवका मध्ये...

पिंपरी चिंचवड- प्रभाग क्र 16 मध्ये माजी नगरसेवक व भावी नगरसेवका मध्ये निवडणुकी पुर्वीच फ्लेक्स वरुन जुंपली

0

विकासनगर-देहुरोड,दि.30 नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राष्र्टवादीचे मा.नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या पुतनी नगरसेविका असल्याने मनोज खानोलकर यांच्या मार्गदर्शना खाली प्रभागातील सर्व कामे केली जातात अनेक दिवसापासुन रस्त्याची कामे चालु आहेत तसे प्रभागात अनेक उपक्रम खानोलकर राबवत असतात.शितळानगर येथील स्मशानभुमीचे काम देखील खानोलकर यांच्या प्रयन्तातुन पालिके कडुन करुन घेतले गेले.तसेच कोविड योद्धांचा सन्मान असेल असे अनेक कार्यक्रम घेण्यात आले आहेत. पण अलीकडे लाॅकडाऊन काळा पासुन शिवसेनेचे युवा नेते भावी नगरसेवक राजेंद्र तरस यांनी निवडणुक डोळ्या समोर ठेऊन मच्छरची धुराडी ते सॅन्टाईझर प्रभागात मारण्यापासुन सुरुवात केली.त्यामुळे सोशल मिडियावर ऐकमेकांन वर अरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. तसेच आजी माझी भावी सगळ्यांनी कोविड काळात स्वता सहभाग घेतला आहेत विविध उपक्रम राबवलेत पण आलीकडेच राजेंद्र तरस यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त नेञतपासणी शिबीर अयोजनाचे फ्लेक्स लावले होते त्यावर मनपा प्रशासनाकडुन कारवाई करताना दिसुन आल्याने राजेंद्र तरस चांगलेच संतापले होते त्यामुळे त्यांनी थेट माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्यावर जोरदार टिका केली आहे.त्यालाच प्रतिउत्तर देत भावी नगरसेवक राजेंद्र तरस यांच्या वर मनोज खानोलकर यांनी तोफ डागली व कड्या शब्दात समाचार घेतला आहे.मी स्वता नगरसेवक होतो राजकरण करतो पण खालच्या पतळीचे राजकारण करत नाही.कंगना रणावत सारखे सोशल मिडिया बोलण्या पेक्षा जनतेत राहुन काम करा.सोबत राहुन ताटात घाण करणार्‍यानी अम्हाला शिकवु नये.

भावी नगरसेवक राजेंद्र तरस यांनी काय केलेत आरोप:-जे काम मी करतो ते जनतेसाठी निस्वार्थ करतो परंतु काही लोकांना ते देखवत नाही. मी मोफत मोतबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी व चस्मे वाटप कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमाचे सर्व भागात फ्लेक्स लागलेले आहेत नाव न घेता थेट मनोज खानोलकर यांच्या वर केले टिकास्ञ चांगले काम करत असताना रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर असतो तसे विकासनगर मध्ये जळणारा एक माणूस आहे ते मला आज समजले एक फ्लेक्स राजकीय नसून क्रिकेट चा होता व त्या फ्लेक्स वर केवळ माझा फोटो आहे म्हणून तुम्ही स्वतः दाखवून काढता चांगली गोष्ट आहे माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्ता जे काही सार्वजनिक काम करतो ते पाहून तुमच्या वागण्यातून व लोकांना धमकावून या सर्व प्रकारातून तुमची हार दिसून येत आहे.आज केलेल्या कारवाईचा जाहीर निषेध .मी विरोधकांना माझे प्रत्युत्तर माझा कमामधून देणार त्यांना जे आरोप करायचे ते करूदे गेले 4 वर्ष त्यांनी तेच केले व विकासकामे एक पण झाली नाही की आरक्षण एक पण त्याब्यात घेता आले नाही हे त्यांचे अपयश झाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत आहेत.राजकारण करुन फ्लेक्स काय काढता जनतेच्या मनातुन काढुन दाखवा.पोर्णिमा आमवस्याला दर्शन देणार्‍यांनी फ्लेक्स काढला केवळ राजकीय स्वार्थासाठी सामाजीक कार्याच्या आड येणार्‍या राजकीय वरदस्त असणार्‍या व्यक्तीचा निषेध करतो,गलिच्छ राजकारण करुन आपली स्वताची जुनी ओळख करुन देत आहेत अशी बोचरी टिका मनोज खानोलकर यांच्यावर तरस यांनी केली आहे

माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनी प्रतिउत्तर देत घेतला समाचार (प्रत्यारोप):-विरोधकांना एक सांगणे आहे कि आधी नीट चौकशी करावी व नंतर दुसऱ्यावर आरोप करावा 3 डिसेंबर पर्यंत आचारसंहिता असल्या मुळे फ्लेक्स वर कार्यवाही नगरपालिके कडून करण्यात आली होती व आरोप आमच्या वर लावला आम्हांला जर कार्यवाही कार्याची असती तर आम्ही त्याच दिवशी केली असती ज्या दिवशी फ्लेक्स लावले. माझी एक विनंती आहे कृपया अश्या कंगनाच्या वक्तव्यावर कोणीही विश्वास ठेवू नये व चमकोगिरी करणाऱ्या लोकांपासून सावध राहा
जे अर्धवट ज्ञान घेतलेले नेते आमच्या बरोबर राहून आमच्याच विरोधात आज जे बोलतात अश्या लोकांपासून सर्वानी सावध राहावे हे लोक काहीच गरिबांचा विचार करू शकत नाही एका ठिकाणी DP रोडला दुसऱ्या पक्षाचे Bjp चे नगरसेवक घेऊन अधिकाऱ्यांना धमकावून रोडचे काम बंद पाडायचे व चांगल्या कामाला विरोध करायचा व दुसरीकडे बोंब मारायची मी जनसेवक जनतेची सेवा करतोय,अश्या कंगनाच्या वक्तव्यावर कोणीही विश्वास ठेवू नये आज आमचे फ्लेक्स आचारसंहिता असल्यामुळें काढण्यात आले आमच्या नाम फलकावर काळ्या चिकटपट्या लावण्यात आल्या होत्या गेल्या 30 वर्षांपासून राजकारणात आहे ,परंतु असे घाणेरडे राजकारण आम्ही बघितले नाही ज्या ताटात खायचे त्याच ताटात घाण करण्याची आमची सवय नाही अशा परखड शब्दात खडे बोल सुनावत भावी नगरसेवक राजेंद्र तरस यांचा सोशल मिडियावर खानोलकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

Previous articleधक्कादायक प्रकार ! बाबा आमटे यांची नात आणि डॉ. विकास आमटे यांची कन्या डॉ. शीतल आमटेची आत्महत्या
Next articleहुतात्मा भाई कोतवाल यांनी द-या, खो-यात स्वातंत्र्य लढा उभारला – संजय माने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × two =