Home ताज्या बातम्या “आया देश विक्रेता” हे गाणं गायिल्यामुळे गायकांना जीवे मारण्याची धमकी

“आया देश विक्रेता” हे गाणं गायिल्यामुळे गायकांना जीवे मारण्याची धमकी

0

मुंबई दि.08नोव्हेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- विशाल गजीपुरी व सपना बौद्ध यांनी एक प्रबोधनपर गीत गायिले असून ते प्रधानमंत्री मोदी यांच्या वास्तवावर अवलंबून असल्याने मोदीभक्त या दोन गायकांना जिवंत मारण्याचा प्रयत्न करत असून त्यांना तशी धमकी ही देण्यात आली आहे, या अंधभक्तांकडून संरक्षण देण्यात यावे अशी मागणी आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष व पँथर ऑफ सम्यक योद्धा संघटनेकडून कडून करण्यात आली आहे.

देशाचे महामहिम राष्ट्रपती यांना दिलेल्या निवेदनात असे उल्लेखिले आहे की, उत्तर प्रदेश गाजीपुर मध्ये राहणाऱ्या विशाल गाजीपूर व सपना बौद्ध यांनी “आया देश विक्रेता” हे गाणं गायिल्यामुळे अंधभक्तांकडून या गायकांना जीवे मारण्याची धमकी मिळत असून त्यांनी संबंधित पोलीस ठाणेत तक्रार पण दिली आहे.

त्या तक्रारीहून भारतीय दंडसंहिता व एस.सी, एस.टी कायद्याप्रमाणे 506 507 435 कलमनाव्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे, मात्र; या गायकांपुढे भीतीचे सावट निर्माण झाले आहे, त्यांचा स्टुडिओ सुद्धा अंधभक्तांकडून जाळण्यात आला आहे.गायक गायिका सध्या त्यांच्या राहत्या घरी नसून त्यांनी भीतीपोटी घर सोडले आहे, त्यांच्या जीविताला धोका आहे, उत्तर प्रदेश सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सदर कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे.या गायकांची 2 वर्षाचे मुल असून त्या मुलालचे भविष्य या घटनेमुळे अंधकारमय झाले आहे.

कोरोना सदृशय परिस्तिथीत यांना अन्यस्त्र लहान मुलाला घेऊन फिरावे लागते आहे, आंबेडकर विचारांच्या लोकांनी मदत तर करावीच परंतु सरकारचे परम कर्तव्य आहे की आपल्या जनतेला संरक्षित करणे,या पती पत्नी व त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाची काळजी घ्यावी व संरक्षण द्यावे शिवाय त्यांच्या परिवाराला पण संरक्षित करावे व धमकी देणाऱ्या अंडभक्तांना कठोर शासन करावे.

अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय युवाध्यक्ष कनिष्क कांबळे व पँथर ऑफ सम्यक योद्धा संस्थापक अध्यक्ष पूज्य बौद्ध भिक्षूं शिलबोधी यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश मुख्यमंत्री मा योगी आदित्यनाथ यांच्या निवास स्थानासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही पँथर डॉ. राजन माक्निकर यांनी दिला आहे.

https://youtu.be/oIJNPPuCvo4

संविधानाने लोकशाही निर्माण केली असून स्वतःचे मत प्रकट करण्याचा अधिकार समविधान देते हा हक्क जोर जबरदस्ती करून हिरावला जात आहे, उत्तर प्रदेश मध्ये बौद्ध मागासवर्गीय व मुस्लिमांवर अन्याय अत्याचार वाढले आहेत, यासाठी सरकारने योग्य पाऊले उचलून वंचित, गरीब, सर्व जातीतील महिला व मुस्लिमांना संरक्षण देने महत्वाचे आहे असे मत आमच्य प्रतिनिधींशी बोलतांना पँथर डॉ माकणीकर यांनी व्यक्त केले.

वीरेंद्र लगाडे, पँथर श्रावण गायकवाड, राजेश पिल्ले, निरंजन दलाल, स्वप्नील गायकवाड, भाई शिवा राठोड, सचिन भूटकर, हिरामण साळवी, ऍड. नितीन माने, वसंत लांमतुरे आदी पदाधिकाऱ्यांची नावे व स्वाक्षऱ्या आहेत.

Previous articleराज्यपालांच्या हस्ते डॉ.आंबेडकर पुरस्कार प्रदान;सुनिल शेट्टी, सोनू निगम, रिचा चड्डा, भारती लव्हेकर सन्मानित
Next articleकोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

13 − one =