भोसरी,दि.23 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- कामगार नेते हिरामण शंकर कडलक (वय 71) यांचे वृद्धापकाळाने सोमवार दि.19 आॅक्टोबर 2020 रोजी निधन झाले. फिलिप्स इंडिया लिमिटेडमध्ये कामगार नेते म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांनी ट्रेड युनियनच्या माध्यमातून कामगारांच्या न्याय मागण्यांबाबत आवाज उठवला. क्रीडाक्षेत्राची आवड असल्याने ते भोसरीत डोळस तालीम मंडळामध्ये तालीम करत. त्यांनी अनेकांना कुस्तीचे प्रशिक्षण दिले.कान्हेवाडी,इंदोरी ता.खेड,जि.पुणे हे त्यांचे मुळ गाव गावापासुन तर भोसरी पंचक्रोषीत त्यांची एक वेगळीच ओळख होती लोक त्यांना नाना म्हणुन संबोधत त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.दि.23 आॅक्टोबर 2020 रोजी आज त्यांच्या राहत्या घरी बसंल विहार सोसायटी दिघी रोड भोसरी या ठिकाणी स. 11.30 वा पुण्यानुमोदन दिनाचा कार्यक्रम संपन्न होईल.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले).मावळ लोकसभेचे कार्यध्यक्ष दिलीप कडलक यांचे ते चुलते होत.तर भोसरी गावचे सामाजीक कार्यकर्ते उद्योजक भाऊ उर्फ प्रविण हिरामण कडलक यांचे वडील होते
शोकाकुल -समस्त कडलक परिवार तसेच समस्त डोळस,लोखंडे,सोनवणे,निकाळजे,तुळवे,चव्हाण,गायकवाड,कांबळे,शिंदे,भालेराव,रोकडे परिवार कान्हेवाडीग्रामस्थ,भोसरी ग्रामस्थ,बंसल विहार सोसायटी परिवार