तेल्हारा,दि.08 अॉक्टोंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-आनंद बोदडे):- तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलेला शिवसैनिकांच्या सतर्कतेने मिळाले जिवदान मंगळवार दि.06 आॅक्टोबर 2020 रात्री सुमारे 11.30 वाजता प्रा .सचिन थाटे यांचे सहकारी मित्र युवासेना उपशहर प्रमुख गौरव धुळे यांचा कॉल आला ते म्हणाले दादा लवकर तेल्हारा ग्रामीण रुग्णालय येथे या त्याच क्षणी प्रा .सचिन थाटे व त्यांचे सहकारी स्वप्नील सुरे यांच्या सह ग्रामीण रुग्णालय येथे पोहचलो .त्याठिकाणी एक गर्भवती महिला व तिचे वडील नामे गट्या पवार ( बेलदार ) रा. वारी हनुमान रुग्णालय बाहेर उभे असलेले व ती गर्भवती महिला रुग्णालय बाहेर वेदनेने किंचाळत होती . विचारपूस केली असता त्या महिलेला अकोला येथे रेफर करण्यात येणार असल्याचे समजले त्या महिलेचे वडील अत्यंत गरीब परिस्थितीतले गाडी अकोला जाण्यासाठी पैसे नाही अश्यावेळी शिवसैनिकांनी गाडी ची व्यवस्था केली व त्याच बरोबर डॉ .तापडिया साहेब यांच्याशी संपर्क करून अंबुलन्स ची सुद्धा व्यवस्था केली पण संबंधित गर्भवती महिलेची परिस्थिती बघता दैव कृपेने तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयातच प्रसूती झाली.गर्भवती महिला व तिचे मूल सुखरूप असुन त्या वडिलांच्या डोळ्यात आलेले आनंदाचे अश्रू बघून मनभारावून गेलं अश्या परिस्थिती कुठल्याही गोष्टीची पर्वा न करता अवघ्या 10 मिनिटात सर्व यंत्राना कामाला लावून त्या गर्भवती महिलेच्या वडिलांना मदतीला युवासेनेचे गौरव धुळे ,शिवसैनिक रवींद्र भटकर, स्वप्नील सुरे , धावून आले शिवसैनिकांनी अभिमान बाळगत समाधान व्यक्त केले