Home ताज्या बातम्या भ्रष्ट अधिकार्‍यानवर कारवाई करा,पिं.चिं.मनपा आयुक्तांनी कोराना संदर्भात ज्योतिषीपणा थांबवावा- इंजि.देवेंद्र तायडे

भ्रष्ट अधिकार्‍यानवर कारवाई करा,पिं.चिं.मनपा आयुक्तांनी कोराना संदर्भात ज्योतिषीपणा थांबवावा- इंजि.देवेंद्र तायडे

0

पिंपरी,दि.13 सप्टेंबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- वंचीत बहुजन आघाडी च्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या भ्रष्ट आणि मनमानी कारभाराच्या विरोधात महापालिकेच्या गेट समोर बेमुदत चक्री उपोषण/साखळी अंदोलन 10 सप्टेबंर 2020 पासुन अंदोलन सुरु आहे.दिनांक 19 ऑगस्ट रोजी मेल च्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने पालिकेला स्मरणपत्र देऊन या पूर्वी दिलेल्या नोटीस व निवेदनांवरील मागण्यांवर कारवाई करण्याची विनंती करण्यात आली होती. प्रशासना कडुन योग्य ती कारवाई झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी तीव्र जन-आंदोलन करेल अशी पूर्वसुचना देखील देण्यात आली होती.. आज रोजी सदर स्मरण पत्रास सादर करून एक आठवड्याहुन अधिक काळ लोटून देखील प्रशासन या संदर्भात भुमिका घेताना दिसत नाही.

या मुळे शहरात वाढणाऱ्या कोरोना संसर्गाला अटकाव करण्यास अपयशी ठरलेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाच्या कुचकामी धोरणांच्या विरोधात व महापालिका प्रशासनाकडून पुढील काही महत्वाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यालगत जो पर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तो पर्यंत सोमवार दिनांक 10 सप्टेंबर 2020 पासुन सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजे पर्यंत लॉक डाउनच्या अटी व नियम पाळून बेमुदत साखळी आंदोलन/चक्री उपोषण करण्यात येत आहेत.

वंचित बहुजन आघाडी,पिंपरी चिंचवड शहर
प्रमुख मागण्या
1) 1 ऑगस्ट 2020 पासुन शहरातील सर्व “कोविड केअर सेंटर”खासगी संस्थांना अव्वाच्या सव्वा दरात चालवायला देण्यात आली मुळात हे सर्व सेंटर 31 जुलै पर्यंत नागरिकांची कुठलीही तक्रार न येता पालिकेने अत्यंत उत्तम रित्या चालवली असताना हे सेंटर्स खासगी संस्थांना देण्यात आले हे सर्व सेंटर्स महापालिकेने खासगी संस्थांकडून काढुन घेऊन पुन्हा स्वतः चालवावेत….
2) आर्थिक गैर व्यवहारात सामील असणारे व ज्यांच्यावर चौकशी सुरू आहे असे वैद्यकीय विभागाचे मुख्य अधिकारी अनिल रॉय व सहभागी अधिकारी यांचे तात्काळ निलंबन करावे
3) साबण व मास्क खरेदीत झालेल्या आर्थीक घोटाळ्यामध्ये सहभागी असणारे अधिकारी, नगरसेवक व कंत्राटदार यांच्यावर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करावी…
4) वैद्यकीय विभागात खासगी तत्वावर कामावर असणाऱ्या सर्व कामगारांना त्यांचे लॉकडाउन काळातील मार्च ते मे या तिन्ही महिन्यांचे संपुर्ण मानधन (पगार) देण्यात यावा व या कर्मचाऱ्यांचा व त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा 50 लाखाचा विमा काढण्यात यावा
5) राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत महापालिकेच्या वतीने मानधनावर घेण्यात आलेल्या सर्व आशा सेविकांना कायम करण्यात यावे
6) माध्यमिकच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या महापालिका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ शैक्षणिक टॅब चे वाटप करण्यात यावे
7) यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय कोविड समर्पित रुग्णालयाच्या धर्तीवर स्थानिकांना इतर आजारांवर मोफत, रास्त व दर्जेदार उपचार मिळावेत या साठी तात्काळ डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालया बरोबर करार करण्यात यावा…
8) यशवंतराव स्मृती रुग्णालयातील अपुरा ऑक्सिजन व ऑक्सिजन पुरवठा यंत्रणेतील बिघाडामुळे रुग्णालयात 8 ते 10 रुग्णांचे झालेले मृत्यू या संदर्भात दोषी असणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक, अधिकारी यांचे निलंबन करून कंत्रातदारावर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचीत बहुजन आघाडी कडुन करण्यात येत आहे.

प्रजेचा विकास साप्ताहीक या वृत्तपञाशी बोलताना मा. इंजि. देवेंद्र तायडे अध्यक्ष:वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर यांनी सांगितले. यावेळी प्रवक्ते के.डी.वाघमारे, राजेंद्र साळवे,मनोज गजभार,दगडु पौळ,सतिश वाघमारे,दिपक भालेराव,सोनु शेळके,गोरख खरात,सुर्यभान कांबळे,साधनाताई मेश्राम,भिमाताई तुळवे,मंदिकिनी गायकवाड ,उषाताई वाघमारे,शामलताई जाधव,सदानंद माने,विष्णु सरपते,विनोद जाधव,भारत कुभांरे,प्रविण गडलिंग,भिम गायकवाड,योगेश वडमारे,अमित कांबळे,धनंजय कांबळे,महेश गायकवाड,अशोक बाण,गणेश बाराथे,भिमाशंकर शिंदे,शांताराम खुडे,अप्पु शिवशरण,प्रतिक उज्जेनकर,परशु पवार आदी.पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleबेजबाबदार अधिका-यांमुळे बाजारात ‘प्लास्टिक कॅरिबॅग्ज’ वापरबंदी असताना रस्त्यावर खुलेआम होतेय विक्री संतोष सौंदणकर यांची राज्य सरकारकडे तक्रार
Next articleऍड. बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाखाली रिपाई चे सर्व गट एकत्र व्हावेत – आरपीआय डेमोक्रॅटिक पक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 + 10 =