Home ताज्या बातम्या देहूरोड मधील एका सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी पोलिसांनी केले तडीपार

देहूरोड मधील एका सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी पोलिसांनी केले तडीपार

0

देहुरोड,दि.29 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- देहूरोड मधील एका सराईत गुन्हेगाराला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.. . पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 ह्यांचे आदेश क्र 12/20 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56(1)(अ)(ब) अन्यवे रेकॉर्ड वरील गुन्हेगार विजय उर्फ भज्जी नागेश तेलगू (वय 23, राहणार -आबेडकर नगर, देहूरोड) असे या तडीपार केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय उर्फ भज्जी नागेश तेलगू हा सराईत गुन्हेगार असून तो पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर 40 पेक्षा जास्त गुन्हे असून बेकायदा शस्त्र वापरण्याप्रकरणी आर्म अॅक्ट हा गुन्हा दाखल आहे.

त्यामुळे त्याला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीतून तडीपार करण्याचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 ह्यांचे आदेश क्र 12/20 महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 56(1)(अ)(ब) नुसार तडीपार करण्यात आले असून त्याला आज रोजी अंबरनाथ मुंबई येथे सोडण्यात आले आहे.

Previous articleबलात्कार करुन पिडीतेस मारहाण करणा-या आरोपीला देहुरोड पोलिसांनी केली अटक
Next articleपिंपरी चिंचवड आणि पुण्यातील कोरोना उपाययोजनांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + nine =