Home ताज्या बातम्या पुण्यात या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने, मुख्यमंत्री-गणेश मंडळ बैठकीत निर्णय

पुण्यात या वर्षीचा गणेशोत्सव साधेपणाने, मुख्यमंत्री-गणेश मंडळ बैठकीत निर्णय

0

पुणे ,दि.20जुन 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय येथील गणेश मंडळांनी घेतला आहे. शासन निर्णयानुसार तसेच लोकहित लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करुया, असे बहुमताने बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील यंदाचा गणेशोत्सव वाजतगाजत होणार नाही. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही सूचना केल्या. तसेच यावेळी मिरवणुकांना परवानगी देणे अशक्य आहे, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यानुसार आता पुण्यात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांसह प्रमुख मंडळांच्या अध्यक्षांसोबत मुख्यमंत्र्यांची आॅनलाईन बैठक झाली. राज्यातील गणेश मंडळांसोबत मुख्यमंत्र्यांनी प्रथमच एकत्रित आॅनलाईन संवाद साधला. यावेळी दीर्घ चर्चा झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव होणार की नाही, या संभ्रमात सगळेच आहेत. दरम्यान, गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या आॅनलाईन बैठकीमध्ये पुण्यातील मानाच्या तसेच प्रमुख गणेश मंडळांच्या अध्यक्षांनी शासन निर्णयानुसार व लोकहित लक्षात घेऊन यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आश्वासन दिले.गणेशोत्सवाची परंपरा खंडीत होऊ न देता आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे. यंदा मिरवणुका न काढता दहा १० दिवस आरोग्य डोळ्यासमोर ठेऊन मंडळांनी काम करायला हवे. ज्याप्रमाणे पालखीसोहळा म्हणजेच वारीला परवानगी देता आली नाही, त्याप्रमाणे गणेशोत्सवात मिरवणुकांना देखील परवानगी देणे यंदा शक्य नाही. यंदाचा उत्सव वाजतगाजत शक्य नाही, त्यामुळे गणेशोत्सव साधेपणाने म्हणजे नेमका कसा, याविषयी मार्गदर्शक तत्त्वे आपण ठरवायला हवी. ती तत्वे ठरवून त्यावर चर्चा करुन पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णयावर शिक्कामोर्तब करु, असे त्यांनी गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, प्रशासन, पोलीस यांच्याशी संवाद साधताना सांगितले.तसेच लॉकडाऊनचे निर्बंध आणखी शिथील झाल्यानंतर पुण्यातील इतरही गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करुन उत्सवाची अंतिम रुपरेषा ठरविली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणपती भवन येथील इमारतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मानाच्या व प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या अध्यक्षांनी संवाद साधला.यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे, तांबडी जोगेश्वरी मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रविण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विवेक खटावकर, भाऊ रंगारी गणपती ट्रस्टचे अध्यक्ष संजीव जावळे, पुनीत बालन, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, नितीन पंडित, अनिरुद्ध गाडगीळ, अ‍ॅड.प्रताप परदेशी, शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे, प्रशांत बधे यावेळी उपस्थित होते.

Previous articleयेत्या रविवारी 21 जून रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातुन दिसणार
Next article‘मिशन बिगिन अगेन’मधील सवलती कायम ठेवत ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen − 16 =