Home ताज्या बातम्या पावसाने पुण्यात कहर केला आहे,झाडे,कमान व मोबाईल टॉवर कोसळला

पावसाने पुण्यात कहर केला आहे,झाडे,कमान व मोबाईल टॉवर कोसळला

0

पुणे,दि.१मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-पुण्यात वादळी वाऱ्यासह पडला पाऊस,यामुळे मोठी कमान आणि मोबाईल टॉवर कोसळला. मोबाईल टॉवर कोसळल्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. यामुळे पुण्याच्या रस्त्यांवर कुणीच नव्हतं. यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.पुणे भवानी पेठ , भगवानदास चाळ,येरवडा जेल रोड समोर रस्त्यावर पावसा मुळे झाड पडले असुन मंगळवार पेठेतील आनंदी नगरमधील रघुकुंज जवळचा टॉवर कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मुसळधार पावसामुळे संचेती चौकातील भुर्यारी मार्गावरील दिशादर्शक लोखंडी कमान पडली,मंगळवार पेठेसारखी मोठी दुर्घटना टळली.बोर्ड भर रस्तावर पडल्याने शिवाजीनगरला जाणारे सर्व रस्ते झाले बंद,शिवाजीनगरमध्ये कमानही कोसळली मात्र रस्त्यावर कुणीही नसल्यामुळे अनर्थ टळला. कमान रस्त्यात आडवी पडल्यामुळे रस्ता पूर्ण ब्लॉक झाला आहे. पुण्यात वादळीवाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.एवढंच नव्हे तर वादळी वाऱ्यामुळे झाडं उन्मलून पडली आहेत. मात्र लॉकडाऊन असल्यामुळे रस्ते मोकळे आहेत. त्यामुळे निर्मनुष्य रस्त्यांवर कुणीही नसल्यामुळे अनर्थ टळला आहे. पण पावसाने पुण्यात कहर केला आहे.

Previous articleदेहूरोड कॅन्टोमेंट येथील आरोग्य यंत्रणेची केली पाहणी,मावळातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासन सतर्क :-आमदार सुनील शेळके
Next articleकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देहुरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाची २४ तास हेल्पलाईन नंबर सुरु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × one =