Home ताज्या बातम्या पुणे विभागात 31 हजार 196 क्विंटल अन्नधान्याची तर 5 हजार 274 क्विंटल...

पुणे विभागात 31 हजार 196 क्विंटल अन्नधान्याची तर 5 हजार 274 क्विंटल भाजीपाल्याची आवक-विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

0
पुणे, दि.24 एप्रिल2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 31 हजार 196 क्विंटल अन्नधान्याची तर 5 हजार 274 क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात 945 क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाटयाची आवक 13 हजार 948 क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त                  डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
 पुणे विभागात 23 एप्रिल 2020 रोजी 99.76  लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून 23.28 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे विभागात 67 हजार 601 स्थलांतरित मजुरांची सोय
1 लाख 40 हजार 71 मजुरांना भोजन
 सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत 153 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 562 कॅम्प असे  पुणे विभागात एकुण 715 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये 67 हजार 601 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 40 हजार 71 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
Previous articleपिंपरी चिंचवड मध्ये’कोरोना’बाधितांची संख्या 82 वर एकाच दिवशी 3 वर्षाच्या 2 मुलींसह 12 ‘पॉझिटिव्ह’
Next articleपश्चिम रेल्वेच्या लोअर परेल कार्यशाळेने कोरोना विषाणू साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईतील आघाडीच्या योद्ध्यांसाठी 1000 पेक्षा अधिक पीपीई सूट तयार केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twenty − 13 =