नवी दिल्ली, 31 मार्च 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-कोविड 19 महामारीच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास विभागाने राज्य सरकारांच्या सहकार्याने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. ग्रामीण विकास विभागाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (एनआरईजीएस) वेतनात 1 एप्रिल 2020. पासून सुधारणा केली आहे. यात सरासरी 20.रुपये वाढ करण्यात आली आहे. महात्मा गांधी एनआरईजीएसचा भर वैयक्तिक लाभार्थी-केंद्रित कामांवर असला तरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि महिलां प्रमुख असलेल्या कुटुंबांना तसेच छोट्या आणि अल्पभूधारक शेतकरी आणि इतर गरीब कुटुंबांना याचा थेट लाभ मिळतो. मात्र तरीही लॉकडाऊन अटींचे उल्लंघन होणार नाही आणि सामाजिक अंतराच्या निकषांचे काटेकोरपणे पालन केले जाईल हे सुनिश्चित करण्यासाठी राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर विस्तृत चर्चा आणि मार्गदर्शन आवश्यक असेल.
वेतन आणि अन्य थकित रक्कम अदा करायला ग्रामविकास मंत्रालय प्राधान्य देत आहे. चालू आर्थिक वर्षातील ही देय रक्कम अदा करण्यासाठी या आठवड्यात विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना 4,431 कोटी रुपये निधी जारी करण्यात आला आहे आणि 2020-21 वर्षातील पहिल्या हप्त्यासह उर्वरित देय रक्कम 15 एप्रिल 2020.पूर्वी जारी केली जाईल. आंध्र प्रदेश राज्य सरकारला 721 कोटी रुपये देण्यात आले आहेत.