भोसरी,दि.24 फेब्रुवारी 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-कलिंदर शेख):-भोसरीतील वंचीत बहुजन आघाडीचे शिरुर लोकसभेतील मा.उमेदवार राहुल ओव्हाळ यांच्या संपर्क कार्यालयात दि. 23 फेब्रुवारी रोजी एक बुरखा घातलेली मुलगी सकाळी 11.00वा आली,ती बाहेरील बाकड्यावर 4.00वा.पर्यंत कार्यालयात बसुन होती.सर्व तिथे कोणी तरी भेटायला आले असेल असे तेथील महिलांना वाटले,पण संजीविनी कांबळे या महिले नी मुलीची चौकशी केली कुणाला भेटायच आहे,तर ती मुलगी अबोल धरुन होती,तिचे हावभाव पाहुन त्यांंनी राहुल ओव्हाळ यांना फोन केला,ओव्हाळ आॅफिस वर लगेच आले व त्यांनी विचारपुस करुन तत्काळ 100नं ला फोन केला,व कंट्रोल वरुन फोन जाताच भोसरी पोलीस स्टेशनचे ठाणे आमलदार एस आय बुढे यांनी बीट मार्शल पाठवले पो.नाईक पेठकर,पो.काॅ.करडे यांनी घटना स्थळी पोहचले व मुलीला घेऊन भोसरी पोलिस स्टेशनला पोचले असता लेडी पो.काॅ.सरीश मलीक यांनी मुलीची खचुन चौकशी केली असता,किरकोळ शेत कामावरुन मायलेकीची भांडण झाले होते रागाने मुलीने घर सोडुन आली होती
माहिती दिली त्या आधारावर तुळजापुर पोलीस स्टेशन ला फोन करून माहिती दिली व घेतली तसेच पोलीस पाटिल यांना फोन केला.मुलीच्या घरी निरोप दिला असता योगायोगाने मुलीचे मामा ग्रामसेवक इब्राईम शेख व अझरुदिन शेख हे हडपसर येथे लग्नाला आले होते,त्यामुळे शेख यांना तुळजापुर पोलीस व पोलिस पाटिल व घरी निरोप मिळाल्या मुळे ते ताबड तोब भोसरी पोलिस स्टेशन ला पोहचले,API बनसोडे यानी मुलीची ओळख पटली व मामाला मुलीने ओळखल्या नंतर चौकशी करुन मुलीला मामाच्या ताब्यात देण्यात ले,मुलीचे मामा यांनी मुलगी सुखरुप मिळाली म्हणुन भोसरी ,ttपञकारांचे,भोसरीतील वंचीतचे बजंरंगी भाईजान राहुल ओव्हाळ व डोळस यांचे आभार मानले व ॠण मानत तुळजापुरकडे रवाना झाले.