वासुली-खेड,दि.१९फेब्रूवारी२०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी-मयुर ओव्हाळ):-
इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील शिवजयंती साजरी केली, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली.आज शिवजयंती निमित्त वासुली ग्रामपंचायतच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली, यामधे महिलाचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता, यावेळी सरपंच श्रीमती.इंदुताई शेळके, पोलिस पाटिल मा.अमोल वसंत पाचपुते, युवा परिवर्तन सोशल फॉउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व बहुजन समाज पार्टीचे युवा नेते मा.मिलिंद गायकवाड आणि सामाजिक कार्यकर्ते मा.सोमनाथ शेळके तसेच वासुली ग्रामपंचायत सदस्य सौ.पुष्पा पाचपुतते व ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग आदी ग्रामस्थ उपस्थित होते