लवकरात लवकर माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलीला ज्याठिकाणी जाळलं त्याच ठिकाणी त्या नराधमाला जाळलं पाहिजे.’ अशी हळहळ पीडित तरूणीच्या वडिलांनी व्यक्त केली.
हिंगणघाट,दि.10फेब्रुवारी2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर संपली आहे. तिच्या अशा जाण्यामुळे तिच्या वडिलांनी हळहळ व्यक्त केली आहे. माझ्या मुलीने मला पाहिलं देखील नाही. अशी प्रतिक्रिया पीडित तरूणीच्या वडिलांनी दिली आहे. तर आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी तिच्या वडिलांनी केली आहे. पीडित शिक्षिकेबाबत झालेल्या ह्रदयद्रावक घटनेचे तीव्र पडसाद अवघ्या महाराष्ट्रभर उमटले आहे.
‘माझी मुलगी माझ्यासोबत बोलली देखील नाही. ती मला शेवटचं पाहू देखील शकली नाही. तिच्या दोषीला कठोर शिक्षा झाली पाहिजे. लवकरात लवकर माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. माझ्या मुलीला ज्याठिकाणी जाळलं त्याच ठिकाणी त्या नराधमाला जाळलं पाहिजे.’ अशी हळहळ पीडित तरूणीच्या वडिलांनी व्यक्त केली.आता तिचा मृतदेह मूळ गावी हिंगणघाट येथे पाठवण्यात येणार आहे. सकाळी ६.५५ मिनटांनी तिने अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारपासून तिची प्रकृती खालावली. हिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेबाबत झालेल्या ह्रदयद्रावक घटनेचे तीव्र पडसाद अवघ्या महाराष्ट्रभर उमटले आहे.
डॉक्टरांनी तिला फुलराणी असे नाव दिले होते. तर ही फुलराणीचे स्वप्न अपूरे राहिले आहेत. सुरवातीला ३ ते ४ दिवस तिने चांगला प्रतिसाद दिला. परंतू शुक्रवारपासून तिची प्रकृती खालावली. शिवाय रक्तदाबात चढ-उतार होत असल्यामुळे तिला श्वास घेण्यात देखील अडथळे येत होते. अखेर आज सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला. तोंडात सुज आल्यामुळे तिला बोलता देखील येत नव्हते.