मंबई,दि.30 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर क्रमांक दोनचे नेते मानले जाणारे अजित पवार यांची यंदाच्या सत्ताकारणाच्या खेळात कमालच झाली आहे. याचे कारण म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून त्यांनी महिन्याभरात दोनदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून दोनदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांनी सुरुवातीला भाजपासोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांनी अतिशय नाट्यमयरित्या पहाटे ८ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर, चारच दिवसांत हे सरकार बहुमताअभावी कोसळले.
त्यानंतर महिन्याभराच्या कालावधीतच आज दुसऱ्यांदा अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. मात्र, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात या पदासाठी शपथ घेतली.
विधानसभा निवडणूक २०१९चा निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाला. यामध्ये भाजपाचे स्वबळाचे स्वप्न भंगलं. तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस महाआघाडीनं गेल्या निवडणुकीपेक्षा चांगली मतं मिळवली. यामध्ये शिवसेना किंगमेकर ठरल्याने त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. भाजपासोबत अडीज-अडीज वर्षे मुख्यमंत्री वाटून घेण्याची त्यांनी मागणी पूर्ण होऊ न शकल्याने अखेर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीसोबत सरकार स्थापण्याचा निर्णय घेतला आणि सर्वाधिक जागा असूनही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची तयारी सुरु झाली.
दरम्यान, किमान समान कार्यक्रमावर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षांमध्ये बराच काळ खल सुरु राहिल्याने आणि मधल्या काळात राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ नेते बनलेल्या अजित पवार यांनी नाट्यमयरित्या भाजपासोबत सरकार स्थापन करीत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. मात्र, त्यानंतर अजित पवार यांच्याकडे आमदारांचा पाठींबा नसल्याने चारच दिवसांत त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला त्यामुळे फडणवीस सरकार अवघ्या चार दिवसांत कोसळले. त्यानंतर आठवडाभरातच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. दरम्यान, राष्ट्रवादीत असलेले अजित पवार या सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्रिपदाचे दावेदार मानले जात होते. त्यानुसार आज त्यांनी महिनाभरानंतर पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना पुन्हा शपथ दिली.
Home ताज्या बातम्या अजित पवार यांचा उपमुख्यमंञी म्हणुन शपथ विधी ; राज्यपाल कोश्यारींनी दोनदा दिली...