मंबई,दि.28 डिसेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
शेतकर्यांना ज्या पद्धतीने कर्जमाफी दिली जाते त्याधर्तीवर राज्यातील मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळाद्वारे देण्यात आलेली कर्जे शासनाने माफ करावीत या मागणीसाठी येत्या दि. 10 जानेवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिपाइंतर्फे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा रिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज केली.
महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, लीड कॉम, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, अपंग विकास महामंडळ, ओबीसी महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ या मागासवर्गीय महामंडळांची कर्ज शासनाने माफ करावीत. मागासवर्गीयांची कर्ज माफी करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा यासाठी येत्या दि. 10 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयांवर निदर्शने करुन राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा ना. रामदास आठवले यांनी केली आहे.
Home ताज्या बातम्या शेतकर्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांचेही कर्ज माफ करा रिपाइंचे दि.10 जानेवारी रोजी राज्यभर...