तेल्हारा,दि.२७ आॅक्टोबर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- चोहीकडे दिवाळीची धामधूम असतांना तेल्हारा शहरातील एका जनरीक मेडीकला अचानक फ्रिजच्या स्फोटाने आग लागल्याने लाखो रुपयांची औषध जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी 12 च्या सुमारास शहरात घडली,तेल्हारा शहरातील विश्वकर्मा सॉ मिल जवळ असलेल्या विशाल जनरीक मेडिकलचे संचालक रोज प्रमाणे दुकानांमध्ये हजर असताना दुकानातील फ्रिजचा अचानक स्फोट होऊन आग लागली फ्रिजला आग लागलेल्याने संपूर्ण मेडिकल आगीने धगधगत असताना तेल्हारा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली.मात्र यामध्ये संपूर्ण दुकान हे जळून खाक झाले.यामध्ये दुकानाचे जवळपास 3 लाखांचे नुकसान झाले आहे. दुकानाचे संचालक विशाल जवंजाळ यांनी सहा महिण्यागोदरच नवीन फ्रिज घेतला होता, फ्रिजचा स्फोट झाल्याने आजुबाजुच्या परीसरात काही काळ भितीचे वातावरण होते, त्यावर अनेक चर्चा केल्या जात आहे.विशाल जवंजाळ या युवकाने स्वतःच्या मेहनतीवर पैसे जमवून काही महिन्याअगोदर जनरीक मेडिकल उघडले होते.मात्र आज दिवाळीच्या सणा च्या दिवशी मेडिकलला आग लागल्याने जवंजाळ यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे.यावेळी आग लागल्याचे समजताच तेल्हारा मेडिकल असोसिएशन चे पदाधिकारी यांनी घटनास्थळ गाठून मेडिकल संचालक विशाल जवंजाळ यांना सहानुभूती देत आर्थिक मदत देऊ केल्याचे सांगितले.