तळेगाव, दि. १८ आॅक्टोबर २०१९ (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी) – शुक्रवारी तळेगाव दाभाडेचे वातावरण काही निराळेच होते.. सकाळपासूनच रस्ते अभूतपूर्व गर्दीने ओसंडू लागले..ठिकठिकाणी मोठमोठ्या आकर्षक रांगोळ्या लक्ष वेधून घेत होते.. फटाक्यांची जोरदार आतषबाजी..फुलांचा वर्षाव.. हलगीचा कडकडाट.. अशा या प्रसन्न वातावरणात तळेगावकर उत्सुकतेने ‘त्यांची’ वाट पाहत होते… तेवढ्यात ‘ते आले..त्यांनी पाहिलं.. आणि त्यांनी जिंकलं..!’ ते होते मावळ मतदारसंघातील सर्वाधिक चर्चेतले आणि लोकप्रिय ठरलेले राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल शंकरराव शेळके ! जागोजागी त्यांच्या स्वागतासाठी जमलेला जनसमुदाय त्यांच्याशी हस्तांदोलन करीत शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसला. महिलांनी त्यांचे औक्षण करीत त्यांना आशीर्वाद आणि सदिच्छा दिल्या तर तरुण मुला- मुलींची त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाली.
कडोलकर कॉलनीतील सुनिल शेळके यांच्या कार्यालयापासून सुरु झालेल्या या प्रचारफेरीत त्यांच्यासमवेत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, तळेगावचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, मंगलताई भेगडे, वैशालीताई दाभाडे, यादवशेठ खळदे, माजी नगरसेवक अय्युब सिकीलकर, शिक्षण मंडळाचे सभापती ब्रिजेंद्र किल्लावाला, नगरसेवक संतोष भेगडे, शिवाजी आगवे, कृष्णराव भेगडे संस्थेचे अध्यक्ष संदेश जाधव, तळेगाव शहर राष्ट्रवादी महिला अध्यक्ष सुनीता काळोखे, माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे, अरुण पवार, तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष खिल्लारे, मंगेश दाभाडे, माजी नगरसेवक दिलीपकाका खळदे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तुकाराम नगर येथील गजानन महाराज मंदिरात सुनिल शेळके यांनी दर्शन घेतले. पंचवटी कॉलनी, राव कॉलनी, मस्करणीस कॉलनी, काळोखेवाडी, श्री नगरी, लक्ष्मीबाग कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, जिजामाता चौक, सुभाष चौक, शाळा चौक, चावडी चौक, डोळसनाथ मंदिर, कुंभारवाडा चौक, भेगडेआळी चौक, गणपती चौक, राजेंद्र चौक, तेली आळी चौक, मारुती मंदिर चौक आदी भागातून दिवसभर ही प्रचारफेरी काढण्यात आली. चौक-चौकात शेळके यांचे तळेगावकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिला. अण्णांनीही त्यांची आपुलकीने चौकशी केली. माता-भगिनींनीही त्यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली होती. लहान मुले देखील आपल्या आवडत्या सुनिल अण्णांचे स्वागत करायला थांबलेली होती. अण्णाही या चिमुकल्यांना उचलून घेत त्यांचे लाड करीत होते. त्यांच्यासोबत सेल्फी काढत होते.
मतदारांच्या गाठीभेटी घेत निघालेल्या सुनिल शेळके हे सर्वांचीच आस्थेने चौकशी करीत होते. मावळ तालुक्याच्या विकासासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही मला सहकार्य करा, मी तालुक्याचा कायापालट करतो, असे ते म्हणाले. मतदारांनीही यावर आमची मते तुम्हालाच, असा प्रतिसाद अण्णांना दिला. शुभेच्छांचा स्वीकार करत, सर्वांशी मनमोकळा संवाद साधत ही प्रचारफेरी उत्साहात पार पडली.
Home ताज्या बातम्या तळेगावात सुनिल शेळकेंच्या प्रचार फेरीला हस्तांदोलन, सेल्फी, शुभेच्छांनी वाढला प्रचारफेरीचा उत्साह !...