तळेगाव,दि.18 आॅक्टोबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना महाराष्ट्र राज्य मावळ तालुक्याच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस मिञ पक्षाचे अधिकृत उमेदवार मा श्री सुनिल आण्णा शेळके यांना जाहीर पाठींबा देण्यात आला तरी उपस्थित मावळ तालुका अध्यक्ष, श्री.तेजसभाऊ निकाळजे, मावळ तालुका उपाध्यक्ष,श्री शशिकांत चव्हाण, तळेगांव शहर अध्यक्ष, पै. सागर (मुन्ना) कांबळे, मा. मजहरभाई शेख,मा. कैलास सातकर (उद्योजक) धैरेंद्र सिंग (उद्योजक)
दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना मावळ तालुक्यातील आदी पदाधिकारी तसेच हजारो कार्यकर्ते समवेत पाठींबा देण्यात आला. या वेळी बोलताना निकाळजे म््हणाले
दििपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना हे राजकारणापलीकडे नातं जपणारी संघटना आहे, समाजकारणावर जास्त भर विकास कामांकडे लक्ष वेधून घेण्याकडे सुनिल आण्णा शेळके यांचे कार्य राजकारणापलीकडे नातं जपण्याचा दिसून आलं व काम करण्याची पद्धत आणि जिद्द पाहता सुनिल आण्णा शेळके यांना दिपक भाऊ निकाळजे सामाजिक विकास संघटना मावळ तालुक्याच्या वतीने, मावळ तालुका अध्यक्ष तेजस निकाळजे यांच्या सहीचे पत्र देऊन पाठिंबा देण्यात आला मावळातील प्रत्येक गावातील रस्ते पाहता मावळात कुठे विकास दिसत नाही पुनर्विकास मंत्री आपल्या गावाचे गाव कामकाज थांबले गावचा पुनर्विकास रडतोय तसंच बंदिस्त जलवाहिनीच्या प्रश्नही जिवंत आहे मंत्री म्हणतात करणार आणि मावळचा आमदार म्हणतो की नाही होणार म्हणजे जनतेची दिशाभूल एकीकडे दिसून येत आहे, कामशेत चा पुल अजूनही अर्धवट आहे त्याचा सिमेंट कुठे गेले कुठे, तसेच देहुरोडचा पुल हि अर्धवट ठेवून त्या पुलाच्या उद्घाटनाची घाई का केली मावळातील शेतकर्यांच्या समस्या व गावातील विजेची समस्या मावळातील बेरोजगारी विद्यार्थ्यांच्या समस्या याकडे मावळच्या आमदारांनी कधी लक्षच दिले नाही मावळ्याचा विकासाकडे कधी लक्षच दिले नाही मात्र त्यांच्या घराचा विकास मात्र केला त्यामुळे मावळ्याचा विकास म्हणजे त्यांच्या घराचा विकास होईल का असा सवाल करत सुनिल आण्णा शेळके हेच मावळा चा विकास करु शकतील सर्व समाजात एकत्र येणारा नेतृत्व जातीय सलोखा पाळणारा नेतृत्व,समाजकार्याचा विडा,शाळा,आरोग्य महिलांसाठी महिला स्वतःच्या पायावर उभे राहावेत म्हणून तर 14000 महिलांना प्रशिक्षण देणारा एकमेव मावळातील व्यक्तिमत्व म्हणून श्री सुनिल आण्णा शेळके हेच मावळाचा विकास करू शकतील त्यांना सर्वांनी निवडून द्यावा