तळेगाव,दि 10 आॅक्टोबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- ‘मावळ का आमदार कैसा हो? सुनिल अण्णा जैसा हो !’ या घोषणेने साते गावासह अवघा मावळ गुरुवारी दुमदुमून गेला. ढोल-ताशांच्या दणदणाटात निघालेल्या मिरवणुकीत संपूर्ण परिसरच ‘सुनिलअण्णामय’ झाला होता. विनोदेवाडी, मोहितेवाड़ी, साते आणि कान्हेगावात राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनिल अण्णा शेळके यांच्या ताफ्याचे उत्स्फूर्त स्वागत झाले. महिलावर्गाकडून अण्णांचे औक्षण करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, नगरसेवक बापू भेगडे, बाळासाहेब ढोरे, गणेश काजळे, एकनाथ एवले, अमृतराव शिंदे, साते ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच यांच्यासह जागृती नगर येथील साहेबराव गायकवाड, अशोक मोरे, शरद मोरे, शशिकांत मोरे, दीपक मोरे, सिद्धार्थ मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर म्हणाले की, सुनील अण्णांना विधानसभेत पाठवायचे आहे, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीने मावळमध्ये भरपूर कामे केली आहेत. विविध विकासकामांसाठी निधी आणला आहे, सत्ताधारी भाजप श्रेय लाटण्याचे काम करीत आहे, विद्यमान आमदारांनी किमान पन्नास लाखांचा निधी तरी आणलाय का? राष्ट्रवादीच्या माध्यमातून किमान पावणे दोन कोटी रुपयांचा निधी रस्ते, दलित सुधार योजना, सभा मंडप यासाठी आणला आहे, सध्याच्या आमदारांनी कोणतीही जनहिताची कामे केलेली नाही, त्यांना बोलायला जागाच् उरली नाही. वायकर यांनी पुढे बोलताना एक काम दाखवा, लाख रुपये मिळवा, असे आवाहनही केले.
सुनिल शेळके म्हणाले की, मला भरघोस मताधिक्याने निवडून द्या, त्या संधीचे मावळच्या विकासासाठी सोने करून दाखवतो. ही निवडणूक मावळच्या विकासाची आहे, स्वाभिमानाची आहे. मतदारांनी यावेळी तरी डोळसपणे योग्य उमेदवाराला मतदान करावे.