नांदेड,दि.३१ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-आंबेडकरवादी मिशन मधुन अधिकारी झालेल्या कैलास मोरे यांनी आपल्याच किन्हाळा गावातील मराठा व मातंग समाजातील दोन निर्धार मुलींना शिक्षणासाठी घेतले दत्तक,त्या सदंर्भात गावतील शाळेला पञ देऊन जबाबदारी स्वीकारली.संजीवीनी भोसले या विद्यार्थीनिचे वडिलांचे एडस या अजाराने निधन झाले असुन आई अजारी असते,गावातील स्माशनभुमी जवळील झोपड्डीत राहतात.तर शिवानी गायकवाड या पहिलीत शिकणार्या मुलीच्या वडिलांनी आत्महत्या केली,अशा बिकट परिस्थिती ओढवलेल्या ह्या दोन मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेऊन सामाजीक ऋण फेडण्यासाठी पुढे आलेल्या कैलास मोरे यांचे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे.तसेच शिक्षण क्षेञातील मदत हि सर्वश्रेष्ठ मदत आहे,त्यामुळे बुद्धिजीवी आधिकार्यांनी शिक्षण क्षेञातील गरजुवंत विद्यार्थ्याना मुलांना मदत करुन माहत्मा फुले- डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षीत बना हा संदेश कृतीत आणावा असे अहवान आंबेडकर वादी मिशनचे प्रमुख दिपक कदम सर यांनी केले.