पिंपरी,दि.२८आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-राष्र्टवादीला गळती लागली असताना राष्र्टवादीचे अनेक नेते संभ्रमात आहेत,तरी राष्र्टवादी सोबत राहुन पवार साहेबांच्या कार्याला साथ देत व पिंपरीविधान सभेच्या दृष्टीने विकास कामे पुर्ण करण्यासाठी शेखर ओव्हाळ राष्र्टवादी सोबत आहेत.पिंपरी मधील मागसवर्गातील लोक संख्या जास्त असुन पिंपरी विधान सभेतील आजी माजी नगरसेवक सोबत असुन राष्र्टवादीचाच आमदार म्हणुन शेखर ओव्हाळ जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे,पिंपरी विधान सभा मतदार संघात अनेक विकासकामे आहेत त्याकडे कुणाच लक्ष नाही श्रेयवादा मध्ये गुंतलेल्या सर्व इच्छुक आणि नेत्यांचे लक्ष भरकटलेले आहे,पिंपरी मध्ये झोपडपट्टी पुर्नवसनाचा प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे.युवक वर्गा सोबत दिपकभाऊ निकाळजे सामाजीक विकास संघटनेच्या वतीने त्यांनी तरुणानवर व पुणे महाराष्र्टात चांगलीच सामाजीक कार्याची पकड बसवली आहे,सतत निस्वार्थी,चांगली प्रतीमा मा.नगरसेवक,मनमिळाऊ नेता म्हणुन त्यांची ओळख आहे,तरुणांन साठी काही तरी करायच आणि पिंपरी मतदार संघ हा विकास कामानी भरून टाकायचा असे शेखर ओव्हाळ यांचे उदिष्ट सोशल मिडियाच्या आणी कार्यकर्त्याच्या प्रतिसादातुन दिसत आहे,आजचा युवक उद्याचे भविष्य आहे,मग तरुणांनी मागे का राहयचे असे मत त्यांच्या अनेक भेटीतुन जाणवत आहे.पिंपरी मध्ये शेखर ओव्हाळ हे एकटे उमेदवार नसुन प्रत्येक कार्यकर्ते आमदार आहेत म्हणजे शेखर ओव्हाळ म्हणजेच कार्यकर्तेच उमेदवार असा प्रचार शेखर ओव्हाळ यांचा दिसत आहे,त्यामुळे कार्यकर्त्याचे जिव लावुन काम करण्याच्या जिद्दी मुळे शेखर ओव्हाळ हे आमदार होण्याची चिञ दिसत आहेत.
अनेक प्रश्न हातात घेऊन विधान सभेत मांडायचे आहेत,अनेक मतदाराना त्यांच्या हक्काची घरे मिळवुन द्यायची आहेत,बेरोजगार हाताना काम द्यायचे आहे,असा दृष्टीकोन डोळ्यापुढे ठेवुन शेखर ओव्हाळ यांनी सर्व क्षेञातील स्तरावरील मतदारांशी भेटी गाटी सुरु आहेत,अनेक सांस्कृतीक,धार्मिक सामाजीक कार्यक्रम व उपक्रम राबवत असतात व घेतायत,अंदोलन असो की कुणाच्या समस्या धडाडीने पुढे येणारे नेतृत्व लक्ष वेधत विकास कामासाठी जनतेच्या सेवेसाठी निवडणुक रिंगणात उत्तरले आहेत,काही कुणी किती दिग्गज नेते पुढे आहेत त्या विरोधात शेखर ओव्हाळ यांची लढत नसुन फक्त जनतेच्या सेवेसाठी स्वतः जबाबदारी स्वीकारुन पार पाडण्यासाठी निवडणुक लढवीत आहे,असे अनेक कार्यक्रमातुन शेखर ओव्हाळ बोलताना आढळतात,त्यामुळे शेखर ओव्हाळ राष्र्टवादीचा गड राखतील असा विश्वास कार्यकर्ते व मतदारांमध्ये आहे,राष्र्टवादीने शेखर ओव्हाळ यांना तिकीट दिले, तर जी गळती होत आहे तीथे नवीन पालवी राष्र्टवादी मध्ये फुटेल.व अनेकांचे राष्र्टवादी मध्ये येण्याचे संकेत वाढतील,व शेखर ओव्हाळ यांना तिकीट म्हणजे सर्व तरुण कार्यकर्त्याना तिकीट मिळाले अशी भावना सर्व तरुण कार्यकर्त्यामध्ये राहील,पक्ष श्रेष्ठीची वाट पहात असले तरी शेखर ओव्हाळ हे रोज मतदारांच्या भेटी घेत समस्या प्रश्न जाणुन घेत आहेत,शेखर ओव्हाळच आमदार होतील अशी चर्चा कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात चालु आहे.