पुणे,दि.२८ आॅगस्ट २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
संघर्षानेच पेटलेला जन्म आमुचा म्हणुन काय संघर्षातच मरायचे,-विकास साळवे
(09822559924)
-द्वेषाने नव्हे तर मैत्रीच्या संवादाने जगात शांतता नांदेल म्हणुन बुध्दाने शांतीचा संदेश दिला अन् धर्मांध ठेकेदारांच्या पायाखालची जमीनच सरकली,आपली अस्तीत्वहीन देवाच्या दरबारातली दुकानदारी बंद हेणार म्हणुन आकांडतांडव सुरू झाले,अन् द्वेषाने पेटलेल्या धर्मांध ठेकेदारांनी मग पुढील काळात मैत्रीचा संदेश देणा-या अनेक समाजसुधारकांच्या हत्या केल्या,
मानतावादी तथा समतावादी विचारधारेला भुगर्भात पेरणा-या देहाला ही धर्मांध ठेकेदार मारू शकली परंतु त्या समाजसुधारकांचे विचार मारण्यात अपयशी ठरले, ते कदापीही जमणारे नव्हते,म्हणुन देशात फक्त अशांतता पसरवित राहणे एवढेच धोरण या धर्मांध ठेकेदारांनी स्विकारले,परंतु त्यावर मात करत पुढे अनेक समाजसुधारक,बुध्दीवंत,विचारवंत या भुतलावर जन्म घेतच राहीले,
त्यात महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला,अल्पावधितच इथल्या जात्यांध व्यवस्थेचा गलिच्छ अनुभव बाबासाहेबांना आला आणि म्हणुन या व्यवस्थेविरूध्द बाबासाहेबांनी दंड थोपटले,बाबासाहेबांनी दंड थोपटताच या जात्यांध व्यवस्थेला घाम फुटला,परंतु बाबासाहेबांच्या अथांग बुध्दीमत्तेपुढे त्यांचा टिकाव लागला नाही आणि या धर्माध ठेकेदारांना गुडघे टेकावे लागले,
हाच द्वेष मनात ठेवुन आजवर ही जात्यांध व्यवस्था काम करीत आहे,जी गोष्ट कदापीही शक्य नाही त्यावरच उभ्या आयुष्याची शक्ती ही व्यवस्था खर्च करीत आहे,म्हणुन महामानवाच्या पुतळ्याची विटंबना करणे,तोडफोड करणे,हा त्यातलाच प्रकार आहे,अस्तीत्वहीन देवा धर्माकडे बुध्दी गहाण असलेली सैतानं बुध्दीमत्तेवर कधीच विजय प्राप्त करू शकत नाही हे त्यांना ठावुकच नाही,कारण अक्कल गहाण असलेल्या सैतानांना तेवढी समज असेल असे मला वाटत नाही,म्हणुन या सैतांनांचा द्वेष करत बसण्यापेक्षा त्यांच्या अज्ञानाची किव करून आपण आपल्या प्रबोधनाची गती आणखी तीव्र केली पाहीजे असे मला वाटते,
निषेध मोर्चात वेळ वाया घालविण्यापेक्षा घराघरात बुध्द – फुले- बाबासाहेब रूजवले पाहीजे,समतावादी राजे शिवराय,संभाजीराजे पेरले पाहीजेत,जीजाऊंच्या संस्कृतीचा वारसा जोपासला पाहीजे,सावित्रीच्या लेकींना घडविले पाहीजे,माता रमाईचा त्याग व मिरा आत्याचा त्याग शिकविला पाहीजे,
आपल्यातली एकी टिकवुन धर्मांध सत्तेवर प्रहार केला पाहीजे,तरच आपल्याला माणुस म्हणुन जगता येईल,
अन्यथा ही पिसाळलेली धर्मांध कुत्री सातत्याने चावा घेत राहतील,
रक्तबंबाळ करून सोडत राहतील,
म्हणुन रक्ताचा वारस करत बसण्यापेक्षा बाबासाहेबांच्या संस्कृतीचा वारस जपायला हवा,
आजही लक्षात ठेवा,
कुणाचे भक्त बनण्यापेक्षा बाबासाहेबांच्या विचारांचेच अनुयायी बना,
एक जुनी म्हण आहे,
माझ्याच रक्ताने माझाच घात केला
असे म्हणण्याची आपल्यावर वेळ येऊ नये,
म्हणुन भक्तीरसात तल्लीन होण्यापेक्षा विचारांच्या युक्ती रसात तल्लीन व्हायला हवे असे वाटते,
आम्ही खेकड्यासमान आपसातलेच पाय खेचत बसलो आहोत,
आपल्यात धर्मांध व्यवस्थेसोबत लढण्याची क्षमता नाही असे दिसून येत आहे,
आम्ही शिव्या देतो त्याही आपल्याच माणसांना,
आम्ही मारण्याची भाषा करतो तीही आपल्याच माणसांना,
सांगा मला आम्ही कधी आमच्यावर अन्याय करणा-या जात्यांध धर्मांध व्यवस्थेला किंवा ठेकेदारांना कधी मारले आहे का ? यावर सदसदविवेक बुध्दीने विचार करा आणि जागृत व्हा,
मनुची पिलावळ सक्षमपणे विकृत बीजे पेरत आहे व त्याची रोपटे ते उगवत आहे,
आम्ही आजही आमुच्याच मस्तीत बेधुंदपणे जगत आहोत,
काळ हातातून निसटून जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत,
आपण कधीच हरणार नाही हे जरी खरं असलं तरी आपण वेळीच सावरलो पाहीजे,
वेळीच सावरलो नाही तर ही धर्मांध व्यवस्था असेच युध्द पेटवत राहतील आणि आम्ही फक्त लढतच राहू,
संघर्षानेच पेटलेला जन्म आमुचा म्हणुन काय संघर्षातच मरायचे,
येईल आमुचाही काळ कधीतरी म्हणुन काय नुसतेच आयुष्यभर झुरायचे..*
बुध्द – भिमाच्या विचारसणीत जन्मलो रे आम्ही,
मांजरीसारखे काय जागेवरच म्याव म्याव करता,भिमवाघाचे बछडे आपण म्हणुनच सदा वाघासम गुरगुरायचे..
गरूडासम झेपावण्या पंखात बळ दिलंय भिमाने,
उठ गड्या भावा आता उठ,जिंकाया लढु आता जोमाने..
विकास साळवे,पुणे
+919822559924…✍